Join us

लॅपटॉपवर सतत काम केल्यानं डोळे सतत चुरचुरतात? ड्राय झाले? -५ टिप्स, डोळे सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 13:10 IST

How to Keep Your Eyes Healthy?: तुम्हालाही नेहमीच स्क्रिनवर काम करावं लागत असेल तर डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी या काही गोष्टी रोज करायलाच पाहिजेत..(5 exercises to get rid of dry eyes)

ठळक मुद्दे कामाच्या अधूनमधून १ मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पुढे सांगितलेले काही डोळ्यांचे व्यायाम करा..

हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. जे लोक वेळ घालविण्यासाठी मोबाईल पाहतात, त्यांच्यासाठी तर मोबाईल बघण्याचा वेळ कमी करणे हाच डोळे जपण्यासाठीचा उत्तम पर्याय असू शकतो. पण काही जणांना मात्र कामानिमित्त सलग ८ ते ९ तास लॅपटॉपसमोर बसावे लागते. हल्ली ऑनलाईन क्लासेसचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मुलांनाही सतत लॅपटॉप, मोबाईल बघण्याशिवाय पर्याय नसतो. जेव्हा आपण स्क्रिन पाहात असतो, तेव्हा आपोआपच आपल्या डोळ्यांची उघडझाप कमी होते (blinking eyes exercise for dry eyes). त्याचाच परिणाम म्हणजे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात. डोळ्यांना खाज यायला लागते (How to Keep Your Eyes Healthy?). हे त्रास टाळायचे असतील तर कामाच्या अधूनमधून १ मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पुढे सांगितलेले काही डोळ्यांचे व्यायाम करा..(5 exercises to get rid of dry eyes)

 

डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी ५ टिप्स...

डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची माहिती डॉक्टरांनी visionbydrbhalekar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एरवी दिवसभरात आपण जवळपास १५ हजार वेळा तरी डोळ्यांची उघडझाप करत असतो.

कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे 

पण स्क्रिनसमोर बसल्यानंतर मात्र ती खूप कमी होते. यामुळे मग डोळे कोरडे व्हायला लागतात. 

डोळ्यांचा ओलसरपणा जपायचा असेल तर त्यांची उघडझाप होणं खूप गरजेचं आहे. यासाठी सुरुवातीला काही सेकंदांसाठी डोळे मिटा आणि पुन्हा उघडा. अशा पद्धतीने डोळ्यांची उघडझाप करा.

 

यानंतर काही सेकंदांसाठी डोळे घट्ट मिटून ठेवा आणि त्यानंतर ते हळूवारपणे उघडा.

आता यानंतर पुढच्या काही सेकंदांसाठी डोळे बारीक करून पाहा.

किचनमधला बेकिंग सोडा फुलझाडांसाठी जणू अमृतच.. 'या' पद्धतीने रोपांना द्या, फुलांनी बहरतील रोपं

यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे फॉक्स आय ब्लिंकिंग. यासाठी डोळ्यांचे जे बाहेरचे कोपरे आहेत तिथे एकेक बोट ठेवा. आणि तिथून डोळ्यांचे कोपरे थोडे तिरक्या बाजुने वर ओढा. यानंतर डोळे हळूवारपणे बंद करा. असे हे अवघ्या १- २ मिनिटांत होणारे व्यायाम दिवसातून ४ ते ५ वेळा करा. डोळे निरोगी राहण्यास मदत होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगाहोम रेमेडी