Join us

उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी 'हा' पदार्थ खा, भारती सिंगने सांगितली खास डिश, डिहायड्रेशनच्या समस्या होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 14:23 IST

Bharti Singh Odisha special dish: Traditional Pakhala rice recipe: उन्हाळ्यात घराबाहेर पडत असाल तर हा पदार्थ खाऊ नक्की जा.

उन्हाळा सुरु झाला की, तापमानात वाढ होऊ लागते. सध्या एप्रिल महिना संपत आला असला तरी वातावरणात बदल होताना पाहायला मिळत आहे.(Bharti Singh Odisha special dish) कडाक्याच्या उन्हामुळे आपल्याला घराबाहेर पडणे देखील जीवावर येते.(Summer cooling foods Odisha) उन्हाळ्यात आपण शरीराला थंडावा कसा मिळेल? अधिक गरम होणार नाही याकडे जास्त प्रमाणात लक्ष देतो. (Traditional Pakhala rice recipe) सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.(Odia cuisine for hot weather) या व्हिडिओमध्ये तिने एक खास डिश सांगितली आहे.(Cooling fermented rice recipes) उन्हाळ्यात घराबाहेर पडत असाल तर हा पदार्थ खाऊ नक्की जा. ज्यामुळे आपण दिवसभर हायड्रेट राहू.(Healthy summer rice dishes India) तसेच आपल्या शरीराला आतून थंडावा मिळेल. यात असणारे घटक आपल्या शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात. (Why Pakhala rice is good for heatwave)     

कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

ओदिशातील पारंपरिक पदार्थ पखाला भात. जो प्रामुख्याने ओदिशा, बंगाल, झारखंड आणि आसाम सारख्या भागात खाला जातो. यामध्ये शिजवलेला भात पाण्यात रात्रभर भिजवला जातो. दुसऱ्या दिवशी हा भात थंड आणि थोडासा आंबट होतो. त्यावर दही, कच्चा कांदा, हिरवी मिरची आणि लिंबू घालून खाल्ला जातो. 

पखाला भात कसा बनवाल? 

भारती सिंग म्हणते की, सगळ्यात आधी भात उकळवून शिजवून घ्या. तांदूळ शिजल्यावर थोडा थंड झाल्यास त्यात पुरेसे पाणी घाला ज्यामुळे तांदूळ पूर्णपणे भिजेल. ७ ते ८ तास तांदूळ भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून तांदूळ काढा त्यात दही, काळे मीठ, कांदा आणि लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. आपण या भाताला फोडणी देखील देऊ शकतो. 

">

शरीर कसे थंड राहिल? 

1. रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवल्याने भातामध्ये गुड बॅक्टेरिया तयार होतात. जे पोटासाठी खूप फायदेशीर असतात. 

2. पाण्यात भिजवलेले तांदूळ पोट थंड ठेवते आणि पचनक्रियाही चांगली ठेवते. 

3. या पदार्थामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. हा भात खाल्ल्याने शरीराचे नैसर्गिक तापमान कमी होते. जे शरीराला दिवसभर ऊर्जा प्रदान करते. 

 

टॅग्स : आरोग्यसमर स्पेशलपाककृतीभारती सिंग