Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2023 13:03 IST

Beware of these 4 side effects of lemon water कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसानच होते, त्याचप्रमाणे लिंबूचे देखील आहे..

उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली. गल्लोगल्लीत बर्फाचा गोळा, ज्यूस सेंटर, लस्सी सेंटर, कलिंगड, लिंबू पाण्याचे स्टॉल पाहायला मिळतात. उन्हाचा तडाका वाढल्यानंतर, लोकं या स्टॉलवर जाऊन थंड पदार्थांचा आस्वाद घेतात. बहुतांश लोकं या दिवसात लिंबू पाणी जास्त पितात. लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

लिंबूपाणी हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. यासह शरीर हायड्रेटेड राहते. व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि कमी रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. ज्याप्रमाणे लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे त्याचे तोटे देखील आहेत. यासंदर्भात प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट 'निखिल वत्स' यांनी अधिक प्रमाणावर लिंबू पाणी प्यायल्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल माहिती दिली आहे(Beware of these 5 side effects of lemon water ).

शरीरातील अनेक अवयवांचे होईल नुकसान

लिंबू हे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढले तर, त्याचा थेट परिणाम इतर अवयांवर होतो. त्यामुळे अनेक डॉक्टर लिंबू पाणी कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात.

पोटदुखी

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक प्रमाणावर आढळतं, ज्यामुळे अॅसिडीक सिक्रीशन वाढण्याची भिती असते. अशा परिस्थितीत आम्लपित्त होण्याची शक्यता वाढते. यासह उलट्या, जुलाब, मळमळ यासारख्या समस्या उद्भवतात. अनेकांना गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सचा त्रास होतो, त्यांनी लिंबू पाणी कमी प्यावे.

तोंडात फोड येणे

लिंबूच्या सेवनामुळे श्वासाची दुर्गंधी आणि दात स्वच्छ होतात. परंतु लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास, त्यातील सायट्रिक ऍसिडमुळे तोंडातील टिश्यूमध्ये सूज निर्माण होते. ज्यामुळे तोंडात फोड येतात, व जळजळ होते.

चिया सिड्स खाऊन खरंच वजन कमी होते? ते भिजवून खावे की भाजून? - नक्की खरे काय..

कमजोर दात

लिंबूमुळे दात स्वच्छ होतात. मात्र, अतिसेवनामुळे दात कमजोर होण्याची शक्यता देखील वाढते. लिंबू पाणी पिताना नेहमी स्ट्रॉने पिण्याचा प्रयत्न करा. कारण याने लिंबाच्या रसाचा संपर्क थेट दातांशी येणार नाही. असं केल्याने दात कमजोर होणार नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्ससमर स्पेशलआरोग्यलाइफस्टाइल