Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हेल्दी लिव्हरसाठी खायलाच हव्यात 'या' ३ भाज्या! सर्वात स्वस्त आणि घरगुती उपाय - लिव्हर राहील सुपरहेल्दी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 19:05 IST

best vegetables for liver health : foods good for liver function : vegetables to improve liver health : उन्हाळ्यात लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या ३ भाज्यांचा आहारात समावेश करावा...

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकणे, पचनक्रिया सुरळीत ठेवणे आणि पोषक घटकांचे योग्य शोषण होण्यासाठी लिव्हरचे कार्य खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरातील जास्तीत जास्त महत्त्वाची कार्ये लिव्हर एकटे पार पाडते. रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत लिव्हर अनेक कार्य सुरळीत पार पाडतो. पण सध्याच्या धावपळीची लाईफस्टाईल, जंक फूडचे वाढते प्रमाण आणि चुकीच्या आहारामुळे लिव्हर संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत, यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहारावर भर देणं अधिक गरजेचं ठरतं. विशेषतः काही भाज्या अशा असतात ज्या लिव्हरची डिटॉक्स प्रक्रिया सुधारण्यास, त्याला बळकटी देण्यास आणि कार्यक्षम ठेवण्यास मदत करतात(best vegetables for liver health).

AIIMS मधील प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर करून अशा ३ खास भाज्यांबद्दल माहिती दिली आहे, ज्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (foods good for liver function) मानल्या जातात. आपल्या नेहमीच्या जेवणाच्या ताटातील भाज्या यकृताला डिटॉक्स करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या ३ भाज्यांचा आहारात (vegetables to improve liver health) नक्की समावेश असायलाच हवा ते पाहूयात... 

लिव्हरची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या ३ भाज्या आहारात असाव्यात? 

१. बीट :- डॉक्टर सेठी यांचे म्हणणे आहे की, बीट खाणे आपले आरोग्य आणि लिव्हर दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकते. बिटामध्ये आयर्न, फोलेट, फायबर आणि नायट्रेट्सचा चांगला स्रोत असतो, जो स्ट्रेस कमी करण्यास मदत करतो. यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते. स्ट्रेस घेतल्यामुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो. बीट लिव्हरला डिटॉक्स करते आणि पचनशक्तीमध्येही सुधारणा करते. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे आपण बीट कच्चे खाऊ शकता किंवा त्याचा रस देखील पिऊ शकता.

कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिमचं नको आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

२. ब्रोकोली :- लिव्हरसाठी ब्रोकली ही देखील अत्यंत पौष्टिक भाज्यांपैकी एक पौष्टिक भाजी आहे. ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी, के, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असते, जी लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते. ब्रोकलीमध्ये असलेले क्लोरोफिल आणि अँटी-ऑक्सिडंट्स लिव्हरमध्ये साठलेले हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे लिव्हरच्या पेशी चांगल्या प्रकारे कार्य करतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही ब्रोकली खाऊ शकत नसाल, तर कोबी किंवा फ्लॉवर खा. या भाज्या देखील लिव्हरसाठी उत्तम असतात.

स्तनांचं आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी करा ५ उपाय! सैलपणा, ओघळणं होईल दूर - मिळेल सुंदर, सुडौल फिगर...

३. कारले :- बऱ्याच लोकांना कारले खायला आवडत नाही, पण ही कडू भाजी लिव्हरसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ए (Vitamin A), फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरला डिटॉक्स करतात आणि इन्सुलिनला नियंत्रणात ठेवतात. इन्सुलिन नियंत्रणात राहिले तर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या होणार नाही. कारले लिव्हरच्या एन्झाईम्सची पातळी सुधारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते.

नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट... 

या भाज्या नेमक्या कशा खाव्यात ? 

या भाज्या आपण शिजवून खाऊ शकता आणि बीटचा रस पिऊ शकता. आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळाच खा, जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला इतर कोणतीही आरोग्य समस्या किंवा लिव्हरशी संबंधित आजार असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : 3 Vegetables for a Healthy Liver: Affordable Home Remedies

Web Summary : To maintain a healthy liver, include beets, broccoli, and bitter gourd in your diet. These vegetables detoxify the liver, improve its function, and help prevent liver-related issues. Consume them 2-3 times a week as part of a balanced diet.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न