Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कसं? ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत 

उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कसं? ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत 

How To Get Rid Of Vitamin D Deficiency: सकाळचा कोवळा सुर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी मिळविण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण तेच नेमकं आपल्याकडून होत नाही. मग अशावेळी काय करायचं ते पाहा...(vitamin D rich veg food)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 12:14 IST2025-02-12T12:14:11+5:302025-02-12T12:14:51+5:30

How To Get Rid Of Vitamin D Deficiency: सकाळचा कोवळा सुर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी मिळविण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण तेच नेमकं आपल्याकडून होत नाही. मग अशावेळी काय करायचं ते पाहा...(vitamin D rich veg food)

best source for vitamin d, vitamin d rich veg food, superfood for vitamin d, how to get rid of vitamin d deficiency | उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कसं? ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत 

उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कसं? ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत 

Highlightsतुमच्या आहारात हे काही पदार्थ नियमित असू द्या. जेणेकरून शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होईल..

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर आपल्या आहारात सगळे पौष्टिक घटक पाहिजेतच. व्हिटॅमिन डी हा सुद्धा एक असाच अतिशय महत्त्वाचा घटक. हाडं मजबूत ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. त्याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर केस गळायला लागतात, नखं तुटतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि चेतना संस्थेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळायला हवं. आता आपल्याला हे माहितीच आहे की सकाळचे कोवळे ऊन हे व्हिटॅमिन डी चा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे. पण बहुतांश लोकांचं त्या वेळेत घराबाहेर पडणं होत नाही. शिवाय जे बाहेर पडतात त्यांनी सनकोट, स्कार्फ, गॉगल असं सगळं घालून शरीर पुर्णपणे झाकून घेतलेलं असतं (best source for vitamin D). मग अशावेळी शरीराला व्हिटॅमिन डी मिळणार कसं म्हणूनच तुमच्या आहारात हे काही पदार्थ नियमित असू द्या (vitamin D rich veg food) जेणेकरून शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होईल..(how to get rid of vitamin D deficiency?)

व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ

 

१. मशरूम

इंटरनॅशनल सेंटर फॉर कॉस्मेटिक मेडिसिन यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मशरूम हा व्हिटॅमिन डी चा एक उत्तम स्त्रोत आहे. मशरूमचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यामध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असतात.

व्यायाम न करताही फिगर मेंटेन ठेवायची? ५ सवयी स्वत:ला लावून घ्या, नेहमीच दिसाल चवळीची शेंग

त्यामुळे वजन वाढण्याचाही धोका नसतो. त्यामुळे मशरूमचे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..

२. संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यासोबतच त्यामध्ये व्हिटॅमिन D- limonene हा घटकही असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डी आणि सी हे दोन्ही देणारं संत्र नियमितपणे खायलाच हवं.

 

३. चीज

व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात देणारं चीज लहान मुलांच्याही अतिशय आवडीचं असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून चीज खा आणि मुलांनाही खाऊ घाला. 

महिनाभरात ८- १० किलो वजन उतरेल, चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि रोज.... 

४. दूध

दूधामधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्यासोबतच पनीर, तूप या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन डी मिळते. 

 

Web Title: best source for vitamin d, vitamin d rich veg food, superfood for vitamin d, how to get rid of vitamin d deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.