Join us

रात्री चुकीच्या पद्धतीने झोपता? वाढतं कंबर-गुडघ्याचं दुखणं- AIIMS डॉक्टरांनी सांगितला झोपेचा खास फॉर्म्युला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2025 14:00 IST

sleeping position: back pain while sleeping: knee pain while sleeping: मान, कंबर,खांदे आणि गुडघेदुखीची समस्या आपल्यालाही होत असेल तर चुकीच्या झोपण्याच्या पोझिशन्स हे कारण असू शकते.

दिवसभर काम करणं, उभं राहणं, चालणं किंवा तासंतास एकाच जागी बसल्यावर हाडांवर आणि आपल्या स्नायूंवर ताण येतो.(sleeping position) अनेकांना रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर मान, कंबर किंवा गुडघ्यात दुखणं जाणवतं.(back pain while sleeping) आपण या दुखण्याकडे दुर्लक्ष करतो, पण हळूहळू हे दुखणं कायमस्वरुपी साथीदार बनतं. काही जण पोटावर झोपतात, काही जण एका कुशीवर, तर काही सरळ पाठीवर झोपतात. पण प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे वेदनाही वेगळ्या ठिकाणी जाणवतात.(knee pain while sleeping) उशीची उंची, गादीचा प्रकार, झोपण्यापूर्वी फोन वापरण्याची सवय यामुळे स्नायूंवर ताण येतो. (correct sleeping posture) मान, कंबर,खांदे आणि गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.(sleep health tips) ही समस्या वयस्करतेमुळे उद्भवते. ही समस्या सध्या तरुणांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.(how to sleep properly) जर आपल्यालाही हा त्रास होत असेल तर  चुकीच्या झोपण्याच्या पोझिशन्स हे कारण असू शकते. 

नूडल्स खाल्ल्याने येतात मातृत्वात अडचणी? वाढतो अनेक आजारांचा धोका- डॉक्टरांनी दिला इशारा

एम्स रायपूर येथील ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स इंजरी सर्जन डॉ. दुष्यंत चौहान म्हणतात, चुकीच्या पद्धतीने झोपल्यास सांधे आणि मणक्यावर परिणाम होतो. जर आपण चुकीच्या पद्धतीने झोपलो तर आपल्या सांध्यांवर जास्त दबाव येतो. ज्यामुळे वेदना वाढतात. योग्य पद्धतीने झोप घेतल्याने वेदना कमी होऊ शकतात. 

जर आपण एका कुशीवर झोपत असू तर गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवायला हवी. यामुळे आपल्या कंबरेवरील दाब कमी होईल. गुडघ्यांच्यामध्ये उशी ठेवली जाते तेव्हा पाठीचा कणा सरळ राहतो आणि आपले सांधे ताणले जात नाहीत. यामुळे सकाळी उठल्यावर कडकपणा किंवा वेदना टाळता येतात. 

आपण पाठीवर झोपत असू तर गुडघ्याखाली उशी ठेवा. यामुळे मणक्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि शरीराचे वजन जास्त प्रमाणात स्नायूंवर ताण देणार नाही. योग्य पद्धतीने झोपल्यास वेदनाच कमी होत नाही तर पाठीचा कणा सरळ राहतो, रक्ताभिसरण सुधारते. जर आपली पाठ, मान किंवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या स्थितीत सुधारणा करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sleep posture affects back, knee pain? AIIMS doctor shares sleeping formula.

Web Summary : Wrong sleeping positions cause joint and spinal problems, says AIIMS Raipur doctor. Sleeping on your side? Place a pillow between your knees. Sleeping on your back? Place a pillow under your knees for spinal support and better circulation. Improve your sleep position before taking medication.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स