बदललेल्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे थायरॉईड. हा त्रास अनुवंशिक स्वरुपाचाही असतो. हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईड असे दोन प्रकार यामध्ये आहेत. ज्या लोकांना याचा त्रास असतो त्या लोकांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधी तर घेतलीच पाहिजेत, पण त्यासोबतच काही व्यायामही केले पाहिजेत. तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर हे काही झटपट होणारे सोपे व्यायाम पाहा (how to get rid of thyroid problem?). अगदी ५ ते ७ मिनिटांत बसल्याबसल्या तुम्ही हे व्यायाम करू शकता.(Simple Exercise To Get Rid Of Thyroid Problem)
थायरॉईडचा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे?
हायपर किंवा हायपो असा कोणत्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास असेल तरीही हे काही व्यायाम तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरू शकतात, अशी माहिती आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यांनी सांगितलेले व्यायाम कोणते ते पाहूया..
चीनमध्ये भलताच ट्रेण्ड! लहान मुलं करतात धुणी, भांडी, स्वयंपाक आणि आई- बाबा करतात आराम?
१. सगळ्यात पहिला व्यायाम करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसा. मान वर करून आकाशाकडे पाहा. दोन्ही तळहात पाठीमागे घेऊन जमिनीवर टेकवा आणि तोंडाने सिंहमुद्रा केल्याप्रमाणे चेहरा करून आवाज करा. असं ५ वेळा करावे.
२. दुसरा व्यायाम करण्यासाठी मान खाली घ्या. गळ्यावर हनुवटी टेकवून थोडा दाब द्या आणि 'ओम'कार म्हणा. यानंतर ओठ बंद करा आणि 'ओम'कार मधला फक्त 'म'कार ५ वेळा म्हणा.
३. तिसरा व्यायाम करण्यासाठी मान पुन्हा वर करून छताकडे पाहा आणि तोंड उघडा आणि बंद करा. असं साधारण १० वेळा करा.
'साँग ऑफ इंडिया'ने सजवा तुमचं घर! हे रोप घरात ठेवाच, कारण.... वाचा ५ जबरदस्त फायदे
४. यानंतर मान खाली करा. हनुवटीने गळ्यावर दाब द्या आणि सिंहगर्जना केल्याप्रमाणे जीभ बाहेर काढून तोंडाने मोठा आवाज करा. हे देखील ५ वेळा करावे.
५. यानंतर हनुवटी तशीच गळ्यावर टेकलेली ठेवावी आणि तोंडातील लाळ गिळताना घशाच्या जशा हालचाली होतात तसेच ८ ते १० वेळा करावे.