Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आरोग्यासाठी सुपरफूड आहे 'ही' डाळ, रोज वाटीभर खा- गॅस, ब्लोटिंग, हार्मोन्स सुधारतील, गट हेल्थही होईल ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 09:35 IST

healthy lentils: hormone balancing foods: digestion improving foods: रोज जेवणात कोणती डाळ खावी असा प्रश्न अनेकांना असतो. तूर, मूग की मसूर डाळ.

सध्याच्या धावपळीच्या जगात पचनाच्या तक्रारी, पोट फुगणे, वारंवार गॅस होणे, थकवा आणि हार्मोनल असंतुलत होणं या समस्यांना अनेकदा सामोरे जावे लागते.(healthy lentils) अनेक औषधे करुनही आपल्याला फारसा फरक पडत नाही. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीच्या वेळी खाणे, अपुरी झोप आणि सतत कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होतो.(hormone balancing foods) पण आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या काही पदार्थांकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. या डाळीला आरोग्यात सुपरफूड म्हटलं जातं ती म्हणजे मसूरची डाळ. (digestion improving foods) रोज जेवणात कोणती डाळ खावी असा प्रश्न अनेकांना असतो. तूर, मूग की मसूर डाळ. पण प्रत्येक डाळीचे आरोग्यासाठी वेगवेगळे गुणधर्म आहेत. मसूर डाळ ही केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नसून ती आपल्या शरीराला आतून पोषण देण्याचे काम करते. या डाळीत फायबरचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेला देखील चांगली चालना मिळते. नियमितपणे वाटीभर मसूर डाळ खाल्ल्यास आतड्यांची हालचाल सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि गॅस-ब्लोटिंगसारख्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. 

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

गट हेल्थसाठी मसूर डाळ ही अतिशय फायदेशीर मानली जाते. यात असलेले प्रोबायोटिक घटक पोटातील चांगल्या जिवाणूंना पोषण देतात. यामुळे आतडे मजबूत होऊन पचनक्रिया सुरळीत करतात. ज्या लोकांना सतत आम्लपित्त, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर त्यांनी आहारात ही डाळ रोज खायला हवी. 

महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मसूर डाळीत लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात असते. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते. पीसीओडी, अनियमित मासिक पाळी किंवा थकवा जाणवणाऱ्या महिलांसाठी ही डाळ उपयुक्त आहे. 

इतकंच नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील मसूर डाळ फायदेशीर मानली जाते. यामुळे आपले पोट भरलेले राहते आणि ओव्हरइटिंगची समस्या देखील कमी होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ही डाळ चांगली आहे. ही डाळ साधे वरण, उसळ, सूप किंवा कोशिंबीर स्वरूपात खाल्ली तरी शरीराला तिचा पुरेपूर फायदा मिळतो. पण अति तेल-मसाले टाळल्यास परिणाम अधिक चांगले दिसून येतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Masoor dal: The superfood for gut health, hormones, and digestion.

Web Summary : Masoor dal, rich in fiber and essential nutrients, is a superfood. It aids digestion, balances hormones, and promotes gut health. Regular consumption relieves bloating, improves bowel movement, and helps manage weight. It supports women's health issues and controls blood sugar.
टॅग्स : आरोग्य