Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीत सर्दी - खोकला वाढून कफ होतो ? घ्या फक्त चमचाभर मधाचे 'असे' चाटण आणि कफ होईल 'छूमंतर - मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2026 16:32 IST

home remedy to calm cough naturally : natural treatment for dry cough and cold : best home remedy for winter cough : मधात कोणते पदार्थ मिसळून घेतल्याने कफापासून त्वरित आराम मिळू शकतो, पाहा अस्सल पारंपरिक उपाय...

थंडीचे दिवस सुरू झाले की सर्दी-खोकला, घसा बसणे आणि छातीत कफ साचणे या तक्रारी हमखास वाढतात. छातीत कफ जमा झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, सतत खोकला येतो आणि शरीर सुस्त वाटू लागते. छातीत एकदा का कफ साचला की त्याचा खूप त्रास होतो. सतत खोकला, जड छाती आणि श्वास घ्यायला अडचण यामुळे रोजची कामेही अवघड होतात.अशावेळी कफ कमी करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. छातीत साचलेला कफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मधाचा वापर केला जातो हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे परंतु याच मधामध्ये इतरही काही औषधी पदार्थ मिसळले तर त्याचा दुप्पट फायदा होतो(home remedy to calm cough naturally).

आयुर्वेदात 'मध' हे कफावर सर्वोत्तम औषध मानले जाते. मधाचे नैसर्गिक गुणधर्म घशातील खवखव कमी करून छातीतील कफ वितळवण्यास मदत करतात. योग्य पदार्थ मधात मिसळून घेतल्यास कफ मोकळा होण्यास मदत होते. मधात कोणते पदार्थ मिसळून घेतल्याने कफापासून त्वरित आराम मिळू शकतो ते पाहूयात. डाएटिशियन राधिका गोयल (natural treatment for dry cough and cold) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक घरगुती (best home remedy for winter cough) उपाय शेअर केला आहे, कोणता आहे तो असरदार उपाय ते पाहा... 

कफ कमी करण्यासाठी मध, हळद, मीठ आणि काळीमिरी यांचा रामबाण उपाय... 

कफाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला मधात हळद, मीठ आणि काळीमिरी मिसळून खायची आहे. छातीतील साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी मध अत्यंत गुणकारी ठरते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे छातीत साचलेल्या घट्ट कफाला सैल करून बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे घशाची सूज कमी होते आणि खवखवण्यापासून आराम मिळतो. तसेच, संसर्ग दूर करण्यासाठीही मध फायदेशीर आहे.

मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' असते. हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. हळदीमध्ये दाहशामक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. या उपायांमुळे श्वसनमार्गाची सूज कमी होते आणि कफ सहजपणे बाहेर पडतो. मीठ घशातील साचलेली घाण आणि बॅक्टेरिया साफ करण्यास मदत करते. हे घट्ट कफाला पातळ करून बाहेर काढण्याचे काम करते. जेव्हा काळीमिरी हळद आणि मधासोबत एकत्र केली जाते, तेव्हा ते एक गुणकारी औषध म्हणून काम करते आणि कफ मुळापासून दूर करण्यास मदत करते.

नेमका उपाय काय आहे ? 

१ चमचा मध घ्या. त्यात पाव चमचा हळद टाका.त्यात पाव चमचा मीठ आणि चिमूटभर काळीमिरी पूड मिसळा. आता हे सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून घ्या. दिवसातून १ ते २ वेळा हे मिश्रण घ्या. यामुळे कफ आणि घशाच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळेल.

कंबरेचा घेर होईल २८ आणि पोट - मांड्याही होतील सुडौल, या एका लालचुटुक फळाचा रस करेल कमाल, सोपा उपाय...

हा उपाय नेमका कसा आहे फायदेशीर ?

१. जेव्हा आपण हे मिश्रण चाटून खातो, तेव्हा ते घशावर एक संरक्षक थर तयार करते. यामुळे कोरड्या खोकल्यामुळे घशाला पडणारे ओरखडे किंवा होणारी जळजळ थांबते आणि त्वरित आराम मिळतो.

२. हळदीतील 'कर्क्युमिन' शरीर तेव्हाच चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते जेव्हा त्यासोबत काळीमिरी वापरली जाते. काळीमिरी हळदीची ताकद वाढवते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती लगेच अ‍ॅक्टिव्ह होते.

३. सर्दी-खोकला अनेकदा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो.हळद आणि मध हे नैसर्गिक अँटी-बायोटिक्स आहेत. मीठ घशातील ओलावा शोषून घेते आणि तिथे बॅक्टेरियाला वाढू देत नाही. यामुळे संसर्ग वाढत नाही.

४. मधाचा चिकटपणा आणि मिठाचे मिश्रण घशातील आणि छातीतील कोरडेपणा कमी करते. हे मिश्रण फुफ्फुसातील घट्ट झालेल्या कफाला पातळ करते, ज्यामुळे तो खोकल्यावाटे सहज बाहेर पडू शकतो.

५. कफ साचल्यामुळे श्वसननलिका आणि घशाला सूज येते, ज्यामुळे श्वास घेताना घरघर आवाज येतो किंवा जडपणा जाणवतो. हळदीमधील 'कर्क्युमिन' आणि मध ही सूज कमी करतात, ज्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Honey, Turmeric Cure: Beat Winter Cough and Cold Naturally

Web Summary : Winter cough and cold? Try this Ayurvedic remedy: honey, turmeric, salt, and pepper. This mixture soothes the throat, loosens chest congestion, and boosts immunity. A teaspoon twice daily brings relief.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहिवाळाथंडीत त्वचेची काळजी