Join us

तुम्हाला जन्मभर हाडं मजबूत ठेवायचेत? महिना ५० रुपये खर्च, स्वयंपाकघरातील ४ गोष्टी एकत्र करुन रोज खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2025 17:46 IST

Best Home Remedies for Strong Bones: पुढे सांगितलेला उपाय जर नियमितपणे केलात तर हाडांसाठी कधीच कुठलं औषध घेण्याची गरज पडणार नाही.(how to keep bones healthy?)

ठळक मुद्दे सांगितलेला घरगुती उपाय तुमच्या हाडांसोबतच तुमचं आरोग्य जपण्यासाठीही उपयुक्त ठरणारा आहे. 

हल्ली तरुण वयातच हाडांंचं दुखणं कित्येकांच्या मागे लागत आहे. वाढत्या वजनामुळे काेणाचे गुडघे आणि पायाचे घोटे कुरकुरायला लागले आहेत तर सततच्या बैठ्या कामामुळे कमी वयातच तरुणाईची पाठ आणि कंबर गळून गेली आहे. हाडांचं दुखणं टाळण्यासाठी कित्येकजण बाजारात विकत मिळणारे कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण त्यापेक्षाही पॉवरफूल असणारे काही पदार्थ आपल्या स्वयंपाक घरातच असतात. ते पदार्थ जर तुम्ही रोज नियमितपणे खाल्ले तर हाडांचं दुखणं कधीच मागे लागणार नाही. वय वाढलं तरी हाडं ठणठणीत राहतील (how to keep bones healthy?). तो उपाय नेमका कोणता ते पाहूया..(best home remedies for strong bones)

 

शरीराला भरभरून कॅल्शियम देणारे पदार्थ

हा उपाय करण्यासाठी आपल्याला २ चमचे मेथी दाणे, २ चमचे जवस, १ चमचा बडिशेप आणि अर्धा टीस्पून मीरे लागणार आहेत. तसेच १ टीस्पून तूपही लागेल.

गॅसवर छोटीशी कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप टाकून त्यात मेथी दाणे, जवस, बडिशेप हे पदार्थ वेगवेगळे टाकून मंद आचेवर भाजून घ्या.

कार्तिकी एकादशी: उपवासाच्या दिवशी खायलाच हवे 'हे' पौष्टिक पदार्थ- ॲसिडीटी, अपचन होणार नाही

सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये घाला. त्याचवेळी त्यात मिरे घाला आणि मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घ्या.

दिवसातून एकदा ही १ टीस्पून पावडर १ ग्लास पाण्यासोबत घ्या. हाडं तर मजबूत होतीलच पण तब्येतीलाही इतर अनेक फायदे होतील. 

  मेथी दाण्यांमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. तसेच हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात. जवसामध्ये ओमेगा ३ असते. ते देखील हाडांसाठी अतिशय गरजेचे आहे. त्याबरोबर हाडांचे टिश्यू चांगले ठेवण्यासाठी तसेच शरीरातला कोरडेपणा कमी करण्यासाठीही जवस उपयुक्त असतात.

एक्सपर्ट सांगतात जेवण झाल्यानंतर १ छोटीशी लवंग काही वेळ चघळा, कमालीचे फायदे मिळतील

बडिशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. तसेच त्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही भरपूर असतात. शरीरातले पित्त नियंत्रित ठेवून ॲसिडीटी कमी करण्यासाठीही बडिशेप उपयुक्त ठरते. तसेच मिऱ्यांमधून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा ३ पण भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे वर सांगितलेला घरगुती उपाय तुमच्या हाडांसोबतच तुमचं आरोग्य जपण्यासाठीही उपयुक्त ठरणारा आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Four kitchen ingredients for strong bones, even in old age.

Web Summary : Combine methi seeds, flax seeds, fennel, and black pepper for bone health. Roast separately in ghee, grind into a powder, and consume with water daily. This remedy strengthens bones, aids digestion, and reduces acidity, promoting overall well-being.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न