हल्ली अनेक पालकांची तक्रार असते. मुलांचे वजन वाढत नाही, मुले खूपच बारीक दिसतात. वयाप्रमाणे वजन न वाढणं, सतत थकवा, कमी भूक लागणे, आजारपणाला बळी पडणं या गोष्टी पाहून आई-वडिलांची काळजी वाढते.(child weight gain) अनेकजण आपल्या मुलांची एकमेकांशी तुलना करतात. पण खरंतर प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्याची शरीररचना, पचनशक्ती आणि वाढीचा वेगही वेगळा असतो, हे अनेकांना समजत नाही.(foods for child weight gain)
बदलेल्या जीवनशैलीमुळे मुलांचा बाहेरच्या खेळण्याचा वेग कमी झाला आहे. मोबाईल, टीव्ही, टॅब याकडे जास्त वेळ जातो. त्यामुळे त्यांना भूक कमी लागते, पचन मंदावते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. मुलांच्या खाताना देखील अनेक तक्रारी असतात. भाजी, दूध, डाळ नको. त्यांना जंकफूड किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला आवडतात. ज्यामुळे मुलांचं वजन वाढणं कठीण होतं. अशावेळी आपण मुलांना हे ५ पदार्थ नियमितपणे खाऊ घालू शकतो.
1. केळी ही कॅलरीजचा एक उत्तम स्त्रोत आहे आणि ते सहज पचतात. तसेच मुलांना केळी देखील खूप आवडते. आपल्या बाळाचे वजन वाढवण्यासाठी सकाळच्या आहारात केळीचा समावेश करा. किंवा बनाना शेक देखील आपण बनवू शकतो.
2. बाळाचे वजन वाढवण्यासाठी रोज दही आणि चीज खायला देऊ शकता. डॉक्टर म्हणतात दुग्धजन्य पदार्थ, कॅल्शियम आणि प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. जे मुलांसाठी फायदेशीर आहेत. आपल्या मुलांच्या आहारात आपण या दोन्ही पदार्थांचा समावेश करु शकतो.
3. जेवणासोबत आपण शुद्ध तूप वापरल्याने कॅलरीज देखील वाढतात. शरीराचे वजन वाढवण्यासाठी आपण मुलांना चपातीसोबत, भाकरी किंवा डाळीसोबत तूप मिक्स करुन खायला घालायला हवे.
4. अंडी हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. यासाठी आपल्या मुलाचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात अंडीचा समावेश करा. यामुळे प्रथिनांची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल. भरपूर व्हिटॅमिन डी मिळेल.
5. आपण मुलांना घरी नाचणी, बेसन, रवा किंवा गव्हाचे पीठ वापरुन त्याचा हलवा खाऊ घालू शकतो. त्यात डायफ्रुट्स घालायला विसरु नका. यामुळे मुलांना पोषण तर मिळेलच तसेच त्यांचे वजनही वाढेल.
