Join us

डायबिटीस असेल तर गव्हाच्या नको 'या' पिठाच्या चपात्या खा! शुगर वाढण्याचं टेंशनच विसरा, जेवा पोटभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2025 19:28 IST

Best flour for diabetic patients : roti for diabetes control : healthy flour for diabetics : मधुमेह असलेल्यांनी आहारात कोणत्या पिठापासून तयार केलेल्या चपातीचा समावेश करावा, ज्यामुळे शुगर राहील नियंत्रणात...

डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं, कारण चुकीचा आहार रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू शकतो. रोजच्या आहारात चपाती हा मुख्य घटक असतो, पण गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्या सर्वांसाठीच आरोग्याच्या दृष्टीने योग्य असतातच असे नाही. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आहार आणि विशेषतः चपाती किंवा भाकरीसाठी नेमके कोणत्या प्रकारचे पीठ वापरावे असा प्रश्न पडतो. आपण दररोज खातो ती चपाती शरीरातील रक्तातील साखर (healthy flour for diabetics) किती प्रमाणात वाढवते, हे त्या पिठाच्या प्रकारावर अवलंबून असते. साधे गव्हाचे पीठ टाळून, हाय फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पीठ निवडणे मधुमेह नियंत्रणात (diabetes friendly roti) ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. काही धान्य अशी असतात की, त्याच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्या खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर असते. मधुमेह असलेल्यांनी आपल्या आहारात नेमके कोणत्या पिठापासून तयार केलेल्या चपातीचा समावेश करावा, ज्यामुळे त्यांची रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि त्यांना (Best flour for diabetic patients) आवश्यक पोषणही मिळेल, ते पाहूयात... 

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, डायबिटीस असणाऱ्यांनी भरड धान्ये किंवा तृणधान्ये सर्वात आरोग्यदायी फूड मानले जाते. या धान्यात फायबरचे प्रमाण मुबलक असते आणि यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे हे धान्य रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. या धान्यांपासून तयार केलेल्या चपात्या - भाकऱ्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू देत नाहीत. म्हणूनच डायबिटीस असणाऱ्यांसाठी काही खास पिठाच्या चपात्या खाणे  अत्यंत फायदेशीर ठरते.

डायबिटीस असणाऱ्यांनी नेमके कोणत्या पिठाच्या चपात्या खाणे फायदेशीर... 

१. जवाचे पीठ :- जवाला ‘बार्ली’ असेही म्हणतात. याचे पीठ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी जवाच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्या नियमितपणे खाव्यात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझमचा वेग सुधारतो आणि इन्स्टंट ऊर्जा मिळते. हे पीठ फक्त  डायबिटीसच्या रुग्णांसाठीच नाही, तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक व आरोग्यदायी मानले जाते. या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि ब्लड शुगर लेव्हल दोन्ही नियंत्रणात राहतात.

पंतप्रधान मोदींना आवडते ओडिशाची खास कॉफी! पाहा कोरापुट कॉफी म्हणजे काय, खासियत काय...

२. नाचणीचे पीठ :- नाचणीचे पीठ डायबिटीसच्या रुग्णांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. यात डायटरी फायबरचे प्रमाण भरपूर असते. नाचणीच्या  पिठाच्या चपात्या खाल्ल्यानंतर बराचवेळ भूक लागत नाही, त्यामुळे तुम्ही ओव्हरईटिंगपासून वाचू शकता. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  लठ्ठपणा आणि डायबिटीस यांचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या तसेच डायबिटीस असणाऱ्यांनी नाचणीच्या पिठाच्या चपात्या आपल्या आहारात अधिक प्रमाणात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. 

हिवाळ्यात घशाची खवखव- सर्दी - खोकल्यावर नागवेलीच्या पानांचा रामबाण उपाय - एकदाच करा मिळेल आराम...

३. ओट्सचे पीठ :- ओट्समध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. हे फायबर डायबिटीस असणाऱ्यांमध्ये ब्लड शुगर लेव्हलला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, म्हणजेच या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने वजन वाढत नाही. उदाहरणार्थ, १०० ग्रॅम ओट्समध्ये फक्त ६८ कॅलरी आणि सुमारे २१ ग्रॅम फायबर असते. त्यामुळे ओट्सच्या पिठाच्या चपात्या डायबिटीस असलेल्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सांगतो, वर्कआऊट करताना करताय ७ चुका म्हणून होत नाही वजन कमी... 

४. ज्वारीचे पीठ :- ज्वारीचे पीठ हे डायबिटीज असलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या पिठापासून तयार केलेल्या चपात्या खाल्ल्याने शरीराला फायबर, कार्बोहायड्रेट आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो, त्यामुळे ज्वारीचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. म्हणूनच हे पीठ डायबिटीज असणाऱ्यांच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Control Diabetes: Eat these flour chapatis, forget sugar level tension!

Web Summary : For diabetics, choose high-fiber, low-GI flours like barley, ragi, oats, and sorghum. These flours help manage blood sugar levels, aid weight control, and provide essential nutrients. Incorporating these into your diet can significantly benefit diabetic patients.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नमधुमेह