Join us
Daily Top 2 Weekly Top 5

.. तर तुम्ही आधी नाश्ता करा! बॅड कोलेस्टेरॉल आणि शुगर कमी करायची तर ‘असा’ नाश्ता करा पोटभर निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 19:40 IST

Food to Control Cholesterol And Sugar: वाढतं कोलेस्टेरॉल हा तुमच्यासाठीही चिंतेचा विषय झाला असेल तर पुढे सांगितलेला एक पदार्थ नियमितपणे खायला सुरुवात करा...(how to control cholesterol?)

ठळक मुद्दे युनिव्हर्सिटी ऑफ बॉन यांच्यावतीने वाढतं कोलेस्टेरॉल आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याविषयी अभ्यास केला गेला..

आपली जीवनशैली बदलली आणि त्यामुळे कमी वयातच अनेक आजार आपल्या मागे लागू लागले. त्यामुळेच तर वाढतं वजन, वाढती शुगर यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. त्यातच अनेकांना छळणारी आणखी एक समस्या म्हणजे वाढलेलं कोलेस्टेरॉल. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि भयंकर स्ट्रेस अशी काही कारणं त्यामागे आहेत. त्यामुळेच तर कमी वयातच अनेकांचं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड वाढलेलं दिसत आहे (Food to Control Cholesterol And Sugar). ते कमी करायचं असेल तर एक पदार्थ अतिशय उपयुक्त ठरू शकतो, असा अभ्यास नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ बॉन यांच्यावतीने करण्यात आला आहे.(how to control cholesterol?)

 

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा?

युनिव्हर्सिटी ऑफ बॉन यांच्यावतीने वाढतं कोलेस्टेरॉल आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याविषयी जो अभ्यास केला गेला त्यामध्ये जवळपास ३२ लोकांचा एकत्रितपणे अभ्यास करण्यात आला. त्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम होता.

एक्झॉस्ट फॅनवर साचलेली चिकट घाण १० मिनिटांत गायब, पंखा होईल नव्यासारखा चकाचक, घ्या सोपा उपाय

म्हणजेच या लोकांचे वजन, शुगर, बीपी आणि कोलेस्टेरॉल हे सगळेच खूप जास्त होते. या लोकांना आठवड्यातून दोन वेळा ओटमील खायला दिलं गेलं. त्यानंतर असं दिसून आलं की पुढच्या काही तासांतच त्यांच्या शरीरातल्या बॅड कोलेस्टेरॉलची पातळी खाली आली आहे. आणि ओटमीलचा हा प्रभाव त्यांच्या शरीरामध्ये पुढचे २ दिवस टिकून होता.

यानंतर काही दिवस या लोकांनी ओटमील नाश्त्यामध्ये घेतले आणि त्यानंतर त्यांचा नेहमीचा आहार चालू ठेवला. तरीही बहुतांश लोकांच्या शरीरातली कोलेस्टेरॉलची पातळी कमी झालेली दिसली. अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी ओटमील घेतले. पाण्यात शिजवलेल्या ओटमीलमध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळं घातली.

घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! संध्याकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

त्यामुळे त्यांना फायबर आणि प्रोटीन्सही मिळाले. ओटमीलमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पचनक्रिया चांगली करून इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी मदत करतात. त्यामुळे ओटमील हे वजन, शुगर आणि कोलेस्टेरॉल अशा तिन्ही गोष्टी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. ओटमील पौष्टिक असले तरी त्याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. मनाने कोणतेही प्रयोग करणे टाळायलाच हवे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eat This Breakfast for 2 Days, Control Cholesterol, Sugar & Weight!

Web Summary : A study suggests that eating oatmeal twice a week can lower bad cholesterol levels, control weight and sugar. Oatmeal contains good bacteria, fiber and proteins, aiding digestion and insulin resistance. Consult a doctor before making dietary changes.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयरोग