भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जा जिथे चपाती फक्त एक खाद्यपदार्थ नाही तर संस्कृतीचा भाग मानला जातो. अनेक परंपरांचा महत्वाचा भाग म्हणजे चपाती आहे. भारतीय घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या खाल्या जातात. हा कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. (Leftover Chapati Eating Benefits)
ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. अनेकदा रात्री २-४ चपात्या उरल्या तर त्या शिळ्या समजून फेकून दिल्या जातात. पण तुम्हाला कल्पना नसेल शिळ्या चपात्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. यात अनेक पोषक तत्व असतात शिळ्या चपातीत कोणकोणती पोषक तत्व असतात समजून घेऊ. (Benefits Of Eating Stale Chapati)
रेजिस्टंट स्टार्च
जेव्हा चपाती शिळी होते तेव्हा त्यातील स्टार्च रेजिस्टंट स्टार्चमध्ये बदलते. जे एका फायबरप्रमाणे काम करते. लहान आतड्यात पचण्याऐवजी ते मोठ्या आतड्यात पचते. जी गुड बॅक्टेरियाजचं अन्न बनते.
व्हिटामीन्स आणि मिनरल्स
शिळ्या चपातीत व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असता. चपाती व्हिटामीन बी-१, व्हिटामीन बी-३, व्हिटामीन बी-६ चा चांगला स्त्रोत आहे. या आर्यनसुद्धा असते. याशिवाय यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडं मजबूत होतात. पोटॅशियमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
प्रोबायोटिक्स
चपाती १२ ते १५ तास ठेवल्यानं त्यात फर्मेंटेशन प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे गुड बॅक्टेरियाज तयार होतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते.
फायबर्स
ताज्या चपातीत शिळ्या चपातीच्या तुलनेत फायबर्स जास्त असतात. ज्यामुळे गॅसेस, अपचनाची समस्या उद्भवत नाही.
शिळी चपाती खाण्याचे फायदे
शिळ्या चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. गुड बॅक्टेरिया आणि फायबर्सनी परिपूर्ण असलेली चपाती खाल्ल्यानं पोटाचे विकार उद्भवत नाहीत पण वारंवार शिळं अन्न खाणं टाळायला हवं. कधीतरी शिळी चपाती खाणं ठीक आहे पण नेहमी जर तुम्ही शिळ्या चपात्या खात असाल तर भविष्यात तब्येतीच्या समस्या उद्भवू शकता.
कधीतरी उरलेली शिळी चपाती खायला हरकत नाही. शिळी चपाती खाताना हे लक्षात घ्यायला हवं की चपाती जास्त दिवसांची नको. जास्तीत जास्त आदल्या दिवशी बनवलेली मऊ चपाती खाऊ शकता. चपातीचा वास येत असेल, कडक झाली असेल तर अशी चपाती खाणं टाळावं.
Web Summary : Stale roti offers benefits like resistant starch, vitamins, and probiotics. It aids digestion, boosts immunity, and helps control blood sugar. Consume occasionally; avoid if spoiled.
Web Summary : बासी रोटी में प्रतिरोधी स्टार्च, विटामिन और प्रोबायोटिक्स जैसे फायदे हैं। यह पाचन में मदद करता है, प्रतिरक्षा को बढ़ाता है और रक्त शर्करा को नियंत्रित करने में मदद करता है। कभी-कभी सेवन करें; खराब होने पर बचें।