थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. अगदी दिवसभर अंगात स्वेटर घालून बसण्यासारखी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. वातावरण असं थंड झालं की आपोआपच सर्दी होणे, खोकला आणि कफ वाढणे असा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढते. विशेषत: लहान मुलं आणि वयस्कर माणसांना हिवाळ्यात हा त्रास खूप होतो. काही केल्या छातीतला कफ मोकळा होत नाही. वारंवार औषधं घ्यायलाही नको वाटतं. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय काही दिवस करून पाहा (how to use anjeer or fig to get relief from cough?). हा उपाय केल्यास जुनाट खोकला, कफ कमी व्हायलाही मदत होईल.(benefits of eating fig or anjeer regularly?)
छातीतला कफ मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय
छातीमध्ये जमा झालेला कफ मोकळा होण्यासाठी अंजीर खूप उपयुक्त ठरतात अशी माहिती योग अभ्यासकांनी snehyoga_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की २ ते ३ अंजीर घ्या आणि ते ग्लासभर पाण्यामध्ये ८ ते १० मिनिटे उकळवून घ्या.
चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसणार नाही! रोज खा ४ पदार्थ, चेहऱ्यावरुन वय ओळखूच येणार नाही-राहाल चिरतरुण
यानंतर ते पाणी गाळून घेऊन प्या. हा उपाय काही दिवस केल्यास छातीतला कफ लवकर मोकळा होण्यास मदत होते. अंजिरामध्ये असणारा म्युसिलेज हा घटक छातीतला कफ मोकळा करण्यासाठी मदत करतो. हा उपाय सोपा आणि घरगुती असला तरी तो सगळ्यांच्याच प्रकृतीला मानवेल असं नाही. त्यामुळे कफ- खोकल्याचा त्रास खूप दिवस अंगावर न काढता लवकरात लवकर डाॅक्टरांचा सल्ला घेणेच योग्य.
अंजीर खाण्याचे इतर फायदे
१. काही तज्ज्ञ अंजिराला सुपरफूड मानतात आणि इतर कोणत्याही सुकामेव्यापेक्षा अंजीर खाणं जास्त आरोग्यदायी आहे, असं म्हणतात.
२. अंजिरामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंजीर उपयुक्त ठरतात.
हिवाळ्यात सारखी आजारपणं नको ना? २ गोष्टी आठवणीने करा- सुदृढ, निरोगी राहून थंडीचा आनंद घ्या..
३. अंजीरमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाचे त्रास कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीर मदत करतात.
४. अंजीरमधून पोटॅशियम मिळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते. शिवाय त्यात असणारे कॅल्शियम हाडांसाठीही फायदेशीर ठरते.
