पोळी, भाजी, वरण, भात असे पदार्थ आपल्या ताटात जवळपास रोजच असतात. हे पदार्थ तर आरोग्यदायी आहेतच. ते आपण रोजच्या रोज खायलाच पाहिजेत यात काही वादच नाही. पण आपल्या जेवणाची चव तेव्हाच खुलते जेव्हा या ४ पदार्थांच्या सोबत जेवणात तोंडी लावायला लोणचं, कोशिंबीर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात. आता हे तिन्ही पदार्थ आपण अगदी चमचाभर आपल्या ताटात घेत असतो. पण तरीही त्यांच्यामुळे साध्या जेवणाला चव येते. जेवणाला चव आणणे हेच फक्त या पदार्थांचे काम नाही. तर हे पदार्थ दिसायला एवढेसे दिसत असले तरीही ते अतिशय आरोग्यदायी असतात. त्यांच्यापैकीच एक पदार्थ प्रत्येक महिलेने अगदी रोजच्या रोज खायला हवा असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगत आहेत. तो पदार्थ नेमका कोणता ते पाहूया..(Rujuta Divekar Explains Why Chutney is Important in Daily Diet)
प्रत्येक महिलेने रोजच्या जेवणात खायलाच हवा 'हा' पदार्थ
अभिनेत्री सोहा अली खान हिने ऋजुता दिवेकर यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये तिने मेनोपॉजचा त्रास कमी करण्याविषयी त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना ऋजुता म्हणाल्या की आपल्या आहारात रोजच्या रोज चटणी असायलाच हवी.
Liver Cancer: दिपिका कक्कर म्हणते ट्रिटमेंटमुळे केस एवढे गळतात की आंघोळीनंतर १५ मिनिटे.....
आपली खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी एवढंच नाही तर जवस, कारळ यांच्या चटणीही आपल्याकडे आहेत. जोडीला मेतकूट सुद्धा आहेच. यापैकी एखादी तरी चटणी आपल्या रोजच्या जेवणात असायला हवी आणि आपण ती भात, पोळी यांच्यासोबत खायला हवी.
कारण आपल्या रोजच्या जेवणातून जे काही लहान- मोठे पौष्टिक घटक मिळत नाहीत ते पदार्थ वेगवेगळ्या चटण्यांच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे तब्येत ठणठणीत राहण्यास मदत होते.
बीटरूटचा रस पिण्याचे ६ फायदे! आठवडाभर पिऊन पाहा आणि स्वत:च कित्येक चांगले बदल अनुभवा
अगदी रोजच्या रोज आपण चटणी खायला हवी, असा सल्ला ऋजुता दिवेकर देत आहेत. त्यामुळे आता चटणी खाण्याचा कंटाळा करू नका. थोडी का होईना पण रोज थोडी थोडी चटणी खा. यामुळे तब्येतही ठणठणीत राहील आणि जेवणाची चवही खुलेल.