Join us
Daily Top 2 Weekly Top 5

गुळवेलाचे पान फक्त चावून खा, वाढलेली साखर ते तापाचे विकार- ५ आजारांवर गुळवेल गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 17:00 IST

Giloy benefits: Guduchi leaves: Giloy for immunity: गुळवेल कसे खायचे, रोज किती प्रमाणात खायला हवे. याविषयी जाणून घेऊया सविस्तर

आपल्या बागेत अशा काही वनस्पती आहेत. ज्यांना आयुर्वेदात अमृत मानले गेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे गुळवेल. ज्याला संस्कृतमध्ये अमृता असंही म्हटलं जातं. बदलत्या हवामानामुळे वारंवार येणारा ताप असो किंवा रक्तातील कमी झालेली प्लेटलेट्स.(Giloy benefits) गुळवेल हे प्रत्येक समस्येवर रामबाण औषध ठरते. गुळवेलाची काडीच नाही, तर त्याची पानं खाण्याचेही शरीराला प्रचंड फायदे होतात.(Guduchi leaves) आपल्याला सतत थकवा जाणवत असेल, पचनाच्या तक्रारी असतील किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर गुळवेल आपल्यासाठी वरदान ठरु शकते. गुळवेल कसे खायचे, रोज किती प्रमाणात खायला हवे. याविषयी जाणून घेऊया सविस्तर. (Giloy for immunity)

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

गुळवेल हे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. यात मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील मुक्त कणांशी लढतात आणि पेशींचे संरक्षण करतात. आपल्याला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप यांपासून वाचण्यासाठी गुळवेलाचे सेवन करणे अत्यंत फायद्याचे आहे. 

जुन्या आणि वारंवार येणाऱ्या तापावर गुळवेल हे सर्वोत्तम औषध आहे. डेंग्यू किंवा मलेरियामध्ये जेव्हा रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात, तेव्हा गुळवेलाचा काढा किंवा रस घेतल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. हे आपल्या शरीरातील दाहक विरोधी गुणधर्मांमुळे तापाचे तापमान कमी करते. 

आपल्याला बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास होत असेल तर यावर गुळवेल फायदेशीर आहे. आपण गुळवेलाचे चूर्ण कोमट पाण्यासोबत किंवा आवळ्याच्या रसासोबत घेतले तर पचनसंस्था अधिक नीट होते. ज्यामुळे आपले शरीर हलके वाटते. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळवेल हे वरदान आहे. हे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. हे इन्सुलिनच्या उत्पादनाला सुरळीत करण्याचे काम करते. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. 

सध्याच्या धावपळीत आपल्या मानसिक ताण, थकवा जाणवतो. गुळवेलची पाने खाल्ल्यास मानसिक ताण किंवा चिंता कमी होण्यास मदत होते. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मनाला शांतता मिळते. रोज सकाळी गुळवेलाचे एक ताजे पान चावून खाल्ल्याने रक्ताचे शुद्धीकरण होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. पानांमध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

English
हिंदी सारांश
Web Title : Chew Giloy leaves for health benefits: Diabetes to fever relief.

Web Summary : Giloy, an Ayurvedic herb, boosts immunity, fights fever, and aids digestion. It helps manage blood sugar, reduces stress, and purifies blood, promoting overall well-being. Chewing a leaf daily offers numerous health advantages.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स