हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या कित्येक तक्रारी वाढलेल्या आहेत. वाढलेलं कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड किंवा हार्मोन्सचे असंतुलन हे त्यापैकीच काही आजार. अगदी कमी वयातच काही जणांना हे त्रास सुरू झालेले दिसतात. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार वेळीच सुरू करणे खूप गरजेचे आहे. पण त्यासाेबतच काही आयुर्वेदिक उपायही आपण करू शकतो. असाच एक ओव्याच्या पानांचा उपाय डॉक्टरांनी सुचवला आहे (ayurvedic remedies to decrease the level of cholesterol and triglycerides). तो उपाय कसा करायचा आणि त्याचे आरोग्याला कसे फायदे होऊ शकतात, ते पाहूया..(benefits of ajwain leaves to reduce cholesterol and triglycerides)
ओव्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
१. बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडची नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी
२. फॅटी लिव्हरचा त्रासही कमी होतो.
पूजेची चांदीची भांडी काळीकुट्ट झाली आहेत? २ सोपे उपाय, २ मिनिटांत चांदीच्या वस्तू उजळतील-चमकू लागतील
३. हार्मोन्सचे संतुलन राहाते आणि त्यामुळे थायरॉईड, मासिक पाळी, वाढलेलं वजन असे कित्येक शारिरीक त्रास कमी होतात.
४. सायनस, ब्राँकायटीस, पोटातले इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन असे कित्येक त्रास कमी होण्यासाठी ओव्याची पानं फायदेशीर ठरतात.
५. हाडं बळकट करण्यासाठीही ओव्याच्या पानांचा हा उपाय फायदेशीर ठरतो.
ओव्याच्या पानांचा उपाय कसा करायचा?
हा उपाय नेमका कसा करायचा याची माहिती डॉक्टरांनी sowshrirao या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. हा उपाय करण्यासाठी ओव्याची १० ते १२ पानं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती बारीक कापून घ्या.
गौराईला घाला पारंपरिक दागिन्यांचा साज- ५ ठसठशीत देखणे दागिने घरच्या गौरींसाठी घ्यायलाच हवे
ओव्याची बारीक कापलेली पानं, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा मीरे हे सगळे पदार्थ मिक्सरमधून फिरवून अगदी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट एका भांड्यात काढा. त्यात १ ग्लास पाणी घाला आणि हे पाणी उकळवून घ्या. यानंतर पाणी गाळून घ्या. हे पाणी दिवसातून एकदा प्या. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हे पाणी प्यावे. कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड यांच्यासह इतरही अनेक त्रास कमी होतील.