Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांना रोज छळणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी होतील कमी, रोज खा २ चमचे ‘ही’ चटणी-केसही होतील सुंदर

महिलांना रोज छळणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी होतील कमी, रोज खा २ चमचे ‘ही’ चटणी-केसही होतील सुंदर

Ayurvedic chutney for healthy hair: hormone balance in women: Herbal chutney for hair: अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी ही आरोग्यवर्धक चटणी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 17:57 IST2025-08-05T17:53:16+5:302025-08-05T17:57:12+5:30

Ayurvedic chutney for healthy hair: hormone balance in women: Herbal chutney for hair: अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी ही आरोग्यवर्धक चटणी कशी बनवायची पाहूया.

Benefits flaxseed garlic chutney for hair and hormones How to make moringa and curry leaf chutney for women’s daily health | महिलांना रोज छळणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी होतील कमी, रोज खा २ चमचे ‘ही’ चटणी-केसही होतील सुंदर

महिलांना रोज छळणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी होतील कमी, रोज खा २ चमचे ‘ही’ चटणी-केसही होतील सुंदर

महाराष्ट्र म्हणजे चटण्याचं घर. विविध राज्यानुसार, प्रातांनुसार पदार्थाची चव बदलते तशीच अगदी चटणी देखील बदलते. पदार्थ सारखाच असतो परंतु त्यात घातले जाणारे साहित्य मात्र वेगळे.(2 spoons chutney for women’s health boost) खोबरे, तीळ, कढीपत्ता, लसूण याची चटणी आपण कायमच खात आलो आहोत.(Healthy Chutney) गरमागरम वरण भातासोबत तोंडी लावायला आपल्याला काहींना काही हवे असते. आवडती भाजी नसली की, आपण आवडीने खातो ती चटणी.(Ayurvedic chutney) ज्यामुळे जेवणाची रंगत आणखी वाढते.(Natural remedies for women)
पण चटणी रोज नियमितपणे खाल्ल्यास आपले आरोग्य देखील सुधारु शकते.(Daily diet tips for women) यात असणारे घटक आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.(Beauty with herbs) इतकेच नाही यामुळे केसगळतीच्या समस्या, वाढणार वजन, गुडघेदुखी-कंबरदुखी, पोटाचे विकार यांसारख्या समस्या देखील कमी होतात. या चटणीमध्ये असणारे गुणधर्म सर्दी-खोकल्यासारखे आजार देखील बरे करतात.

उकडीच्या मोदकांसाठी आणा फक्त ४०० रुपयांचं भांडं, मोदक होतील पांढरेशुभ्र-मऊसुत आणि झटपट

वाढत्या वयानुसार महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. अशावेळी उठता-बसता चक्कर येते. जरा काम केले की थकवा लागतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पचनक्रिया बिघडते. आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. पण आपण ही आरोग्यवर्धक चटणी रोज दिवसातून २ चमचे खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपली सुटका होईल. यात असणारे घटक हाडे बळकट करण्यास मदत करतात. त्वचेचा पोत सुधारुन रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी होते. मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी तर ही चटणी नेहमी खायला हवी. यातून आपल्या शरीराला विविध पोषण मिळते. कॅल्शियम, ओमागा-३ फॅटी ऍसिडस आणि फायबरचे प्रमाण भरपूर मिळते. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी ही आरोग्यवर्धक चटणी कशी बनवायची पाहूया. 

Rakshabandhan Special : नारळाचं पुरण घातलेली खा ओल्या नारळाची टम्म फुगलेली नारळपोळी, मऊ लुसलुशीत पारंपरिक पदार्थ


साहित्य 

शेवग्याची पानं- २ कप 
कढीपत्ता - १ कप 
अळशी - २ चमचे
तीळ - १ चमचा 
सुक्या लाल मिरच्या - ५ ते ६ 
लसूण पाकळ्या - १/४ कप 
सुके खोबरे - १ कप 
भाजलेले शेंगदाणे - २ चमचे 
मीठ - चवीनुसार 
तेल - २ चमचे 

कृती 

1. सगळ्यात आधी शेवग्याची पानं आणि कढीपत्ता धुवून कपड्यावर ठेवून चांगला सुकवून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई तापवून त्यात शेवग्याची पानं आणि कढीपत्ता घालून कुरकुरीत भाजून घ्या. ताटात काढून घ्या. यात अळशी चांगली तडतडू द्या, वरुन तीळ घालून भाजून ताटात काढा. 

2. आता पुन्हा त्याच कढईत लाल सुक्या मिरच्या भाजून काढून घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत भाजा, वरुन सुक्या खोबऱ्याचा किस आणि तेल घालून हलक परतवून घ्या. नंतर ताटात काढा. 

3. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले साहित्य मीठ घालून वाटून घ्या. तयार होईल आरोग्यवर्धक चटणी. ही चटणी सकाळ-संध्याकाळ जेवण झाल्यानंतर दिवसातून २ चमचे खा. ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल. 


Web Title: Benefits flaxseed garlic chutney for hair and hormones How to make moringa and curry leaf chutney for women’s daily health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.