Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मधमाशी चावली तर चटकन करा ३ उपाय, विष पसरणार नाही-टळेल जीवाचाही धोका...

मधमाशी चावली तर चटकन करा ३ उपाय, विष पसरणार नाही-टळेल जीवाचाही धोका...

Bee Sting Home Remedies : Home remedies for bee stings : home remedies and natural treatments for bee stings : मधमाशी चावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय कराच, पण प्रथमोपचार काय करावे ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 13:12 IST2025-06-18T12:50:38+5:302025-06-18T13:12:05+5:30

Bee Sting Home Remedies : Home remedies for bee stings : home remedies and natural treatments for bee stings : मधमाशी चावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय कराच, पण प्रथमोपचार काय करावे ते पाहा...

Bee Sting Home Remedies Home remedies for bee stings home remedies and natural treatments for bee stings | मधमाशी चावली तर चटकन करा ३ उपाय, विष पसरणार नाही-टळेल जीवाचाही धोका...

मधमाशी चावली तर चटकन करा ३ उपाय, विष पसरणार नाही-टळेल जीवाचाही धोका...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे पती पती आणि उद्योजक संजय कपूर यांच्या निधनाची बातमी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांना मधमाशीच्या चाव्यामुळे अचानक अ‍ॅलर्जिक रिऍक्शन (Anaphylactic Shock) झाल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला आणि त्यातच त्यांचा (Bee Sting Home Remedies) मृत्यू झाला. ही घटना अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे, कारण मधमाशीचा चावा कधी जीवघेणाही ठरू शकतो, याची जाणीव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे(Home remedies for bee stings).

मधमाशी चावल्यावर होणाऱ्या वेदना या अतिशय तीव्र आणि असाहाय्य असतात. मधमाशी चावल्यानंतर वेळेवर योग्य उपाय न केल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू होते. त्यामुळे अशावेळी तात्काळ योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मधमाशीने डंक मारल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असतेच. परंतु आपण मधमाशी चावल्यांनंतर तात्काळ काही प्रथमोपचार (home remedies and natural treatments for bee stings) घरच्याघरीच करु शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी या वेदना कमी करता येतात तसेच विष शरीरात पसरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे असते. मधमाशी चावल्यावर तात्काळ काय करावे जेणेकरून त्रास कमी होईल आणि धोका टाळता येईल ते पाहूयात. 

मधमाशी चावल्यानंतर प्रथमोपचार म्हणून नेमकं काय करावं ? 

मधमाशीने डंक मारल्यानंतर सर्वातआधी ताबडतोब त्या ठिकाणी नखांनी किंवा कोणत्याही सपाट वस्तूने (जसे की कार्ड, पट्टी इ.) हळूवार घासून मधमाशीचा डंक काढून टाका. त्यामुळे डंक त्वचेत खोलवर शिरुन विष पसरण्याची शक्यता कमी होते. डंक काढल्यानंतर त्वचेचा तो भाग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि पुसून कोरडा करा. त्यानंतर सूज व वेदना कमी करण्यासाठी इतर घरगुती उपायांचा आपण वापर करु शकतो.

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...

१. ॲप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) :- ॲप्पल सायडर व्हिनेगर हे मधमाशीच्या विषाचे परिणाम कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. हे त्वचेला थंडावा देऊन सूज व जळजळ कमी करते तसेच वेदनांपासून आराम मिळवून देते. यासाठी एका टबमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात थोडेसे ॲप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. त्यानंतर मधमाशीने चावलेला भाग या पाण्यात सुमारे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्वचेवरील सूज, खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. 

२. बेकिंग सोडा (Baking Soda) :- बेकिंग सोडा देखील मधमाशीच्या चाव्यामुळे होणारी सूज, जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यासाठी थोडंसा  बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मधमाशीने चावलेल्या भागावर लावा आणि सुमारे १५ मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे मधमाशीने चावलेल्या भागावरील परिणाम कमी होईल, खाज थांबेल आणि त्वचेला आराम मिळेल.

पालथं झोपण्याची सवय घातक, ठरु शकते हृदयविकाराचेही कारण- डॉक्टर सांगतात झोपण्याची योग्य पद्धत...

३. टूथपेस्ट (Toothpest) :- मधमाशीने चावलेल्या भागावर टूथपेस्ट लावणे हा देखील एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. टूथपेस्टमध्ये असणारे अल्कधर्मी (Alkaline) घटक मधमाशीच्या विषाचे प्रभाव कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे सूज, जळजळ आणि खाज कमी होते. यासाठी मधमाशीने चावलेल्या त्वचेवर थोडीशी टूथपेस्ट लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे त्वचेला आराम मिळेल आणि त्रास कमी होईल.

Web Title: Bee Sting Home Remedies Home remedies for bee stings home remedies and natural treatments for bee stings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.