Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वारंवार अंगदुखी, मसल पेन? पारंपरिक पोटली मसाज करेल जादू- पेन किलर - मलमपेक्षा सरस उपाय...

वारंवार अंगदुखी, मसल पेन? पारंपरिक पोटली मसाज करेल जादू- पेन किलर - मलमपेक्षा सरस उपाय...

Beat Muscle Pain the Natural Way : Potli Massage Therapy : Herbal Pain Relief Compress Potli : Potli Massage Pain Relief : Ayurvedic Herb Healing Potli - Quick Pain Relief : मसल पेन, अंगदुखी कमी करण्यासाठी पोटली मसाजचा घरगुती उपाय नक्की करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 12:44 IST2025-04-07T12:32:55+5:302025-04-07T12:44:25+5:30

Beat Muscle Pain the Natural Way : Potli Massage Therapy : Herbal Pain Relief Compress Potli : Potli Massage Pain Relief : Ayurvedic Herb Healing Potli - Quick Pain Relief : मसल पेन, अंगदुखी कमी करण्यासाठी पोटली मसाजचा घरगुती उपाय नक्की करून पाहा...

Beat Muscle Pain the Natural Way Potli Massage Pain Relief Ayurvedic Herb Healing Potli Quick Pain Relief | वारंवार अंगदुखी, मसल पेन? पारंपरिक पोटली मसाज करेल जादू- पेन किलर - मलमपेक्षा सरस उपाय...

वारंवार अंगदुखी, मसल पेन? पारंपरिक पोटली मसाज करेल जादू- पेन किलर - मलमपेक्षा सरस उपाय...

आपल्यापैकी अनेकांना वरचेवर अंगदुखी, मसल्स पेनचा त्रास होतोच. खरंतर, ही अगदी कॉमन समस्या आहे. काहीवेळा एक्सरसाइज करताना, कामाचा खूप स्ट्रेस झाला किंवा थकवा (Beat Muscle Pain the Natural Way) वाटत असेल तर स्नायूंमध्ये वेदना होण्याचा म्हणजेच मसल्स पेन किंवा अंगदुखीचा त्रास सतावतो. अशावेळी (Potli Massage Pain Relief) हा त्रास कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर घेतो तसेच मलम ( Potli Massage Therapy) लावून मसाजही करतो. अंगदुखी, मसल्स पेन (Ayurvedic Herb Healing Potli - Quick Pain Relief) कमी करण्यासाठी असे अनेक उपाय करतो परंतु या उपायांसोबतच एक घरगुती पारंपरिक असरदार उपाय देखील करून पाहू शकतो.

अंगदुखी, मसल्स पेन कमी करण्यासाठी पोटली मसाज करण्याचा उपाय हा फार पूर्वीपासून केला जात आहे. एका लहानशा सुती कापडात काही नैसर्गिक व औषधी पदार्थ घालूंन एक पोटली तयार करून घ्यायची. ज्या भागात मसल्स पेन किंवा अंगदुखी होते त्या भागावर या पोटलीने मसाज केल्यास या दोन्ही समस्या नैसर्गिकपणे कमी करण्यास मदत होते. मसल्स पेन किंवा अंगदुखी कमी करण्यासाठी नक्की पोटली मसाजचा घरगुती उपाय करून पाहा. यासाठी नेमकं काय करायच ते पाहूयात.

साहित्य :- 

१. शेवग्याच्या पानांचा पाला - १ कप 
२. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
३. लसूण पाकळ्या - ६ ते ८ पाकळ्या (हलकेच ठेचून घेतलेल्या)
४. सैंधव मीठ - १ टेबलस्पून 
५. हळद - १ टेबलस्पून 
६. सुती कापड - १ छोटा रूमाला इतक्या आकाराचा तुकडा

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...

कृती :- 

१. शेवग्याच्या शेंगाचा पाला स्वच्छ धुवून वाळवून घ्यावा. त्यानंतर एका पॅनमध्ये शेवग्याच्या शेंगाचा पाला, मेथी दाणे आणि हलकेच ठेचून घेतलेला लसूण असे सगळे जिन्नस एकत्रित कोरडे भाजून घ्यावेत. 
२. आता सुती कापड पसरवून त्यात कोरडे भाजून घेतलेले मिश्रण, सैंधव मीठ, हळद घालावे. आता या रुमालाची पोटली तयार करून त्याला गाठ मारून घ्यावी. 

नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

३. आता तवा गॅसच्या मध्यम फेल्मवर ठेवून गरम करून घ्यावा. या गरम तव्यावर ही पोटली ठेवून थोडी गरम करुन घ्यावी. 
४. पोटलीचा पृष्ठभाग आपल्याला सोसवेल इतका गरम झाल्यावर ज्या भागात मसल्स पेन आहे त्या भागावर ठेवून शेकून घ्यावे. यामुळे अंगदुखी आणि मसल्स पेन कमी होण्यास मदत होते.

Web Title: Beat Muscle Pain the Natural Way Potli Massage Pain Relief Ayurvedic Herb Healing Potli Quick Pain Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.