Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बाप्पाच्या आवडीचे जास्वंदाचे फुल म्हणजे आरोग्यासाठी वरदानच !! त्वचा-केस आणि तब्येतीसाठीही फार गुणकारी

बाप्पाच्या आवडीचे जास्वंदाचे फुल म्हणजे आरोग्यासाठी वरदानच !! त्वचा-केस आणि तब्येतीसाठीही फार गुणकारी

Bappa's favorite hibiscus flower is a boon for health!! Very beneficial for skin, hair and health too : आरोग्यासाठी फायद्याचे असते जास्वंदाचे फुल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 15:02 IST2025-08-24T15:01:18+5:302025-08-24T15:02:19+5:30

Bappa's favorite hibiscus flower is a boon for health!! Very beneficial for skin, hair and health too : आरोग्यासाठी फायद्याचे असते जास्वंदाचे फुल.

Bappa's favorite hibiscus flower is a boon for health!! Very beneficial for skin, hair and health too | बाप्पाच्या आवडीचे जास्वंदाचे फुल म्हणजे आरोग्यासाठी वरदानच !! त्वचा-केस आणि तब्येतीसाठीही फार गुणकारी

बाप्पाच्या आवडीचे जास्वंदाचे फुल म्हणजे आरोग्यासाठी वरदानच !! त्वचा-केस आणि तब्येतीसाठीही फार गुणकारी

जास्वंदाचे फूल गणपती बाप्पाला प्रिय मानले जाते आणि ते धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. पण या फुलाचे फायदे केवळ तेवढेच  मर्यादित नसून ते आरोग्य आणि सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. जास्वंदाचे फुल सगळीकडे मिळते. (Bappa's favorite hibiscus flower is a boon for health!! Very beneficial for skin, hair and health too)अगदी आरामात उपलब्ध होते. ही फुल जेवढे सुंदर तेवढेच फायदेशीर आहे. जास्वंदामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टी ऑक्सिडंट्स, फ्लॅव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि जीवनसत्त्व 'सी' असते. जे शरीरातील हानिकारक घटकांशी लढतात आणि पेशींना त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. जास्वंदाच्याच फुलांचा चहा प्यायला जातो. हा चहा नियमित घेतल्यास रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच हा चहा रक्तदाब संतुलित ठेवतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हा नैसर्गिक उपाय फार फायद्याचा ठरतो.

जास्वंदाच्या फुलांचा अर्क महिलांसाठी विशेष फायदेशीर आहे. मासिक पाळीतील अनियमितता, पोटदुखी आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म हार्मोन्सचे संतुलन साधतात. त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जास्वंदाचा काढा उपयुक्त मानला जातो. पचनक्रिया सुरळीत ठेवणे, यकृताचे आरोग्य सुधारवणे आणि मूत्रविकारांवर आराम देणे यासाठीही हे फूल उपयुक्त ठरते.

सौंदर्याच्यादृष्टीने पाहिले तर जास्वंद हे एक वरदानच आहे. याच्या पाकळ्या वाटून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि काळेपणा कमी होतो. त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ती अधिक तजेलदार दिसते. केसांसाठी तर जास्वंद खूपच फायदेशीर आहे. याच्या फुलांचा रस किंवा तेल वापरल्यास केस गळणे थांबते. कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ जलद होते. टाळूतील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात.

त्यामुळे जास्वंद फक्त वाहण्यासाठी नाही तर त्वचेसाठी आणि केसांसाठीही वापरा. त्याचे फायदे भरपूर आहेत. आरोग्यासाठीही हे फुल फायद्याचे आहे. नैसर्गिक उपाय करणे जास्त फायद्याचे ठरते. जास्वंदाच्या फुलाचा काढा करणे अगदी सोपे आहे. फुले पाण्यात उकळवून पिणे फायद्याचे ठरते. हे उपाय नक्की करुन पाहा. 

Web Title: Bappa's favorite hibiscus flower is a boon for health!! Very beneficial for skin, hair and health too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.