Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऑफिसच्या खुर्चीमुळे वाढतोय आरोग्याचा धोका! पाठदुखी-बद्धकोष्ठतेचा त्रास, हाडे होताय ठिसूळ

ऑफिसच्या खुर्चीमुळे वाढतोय आरोग्याचा धोका! पाठदुखी-बद्धकोष्ठतेचा त्रास, हाडे होताय ठिसूळ

Best chair for back pain relief: Sitting posture and constipation: Effects of sitting too long on bones: How to reduce back pain from sitting: Tips to avoid back pain when working at a desk: ऑफिसमध्ये बराच वेळ खुर्चीवर बसल्याने शरीराच्या नैसर्गिक हालचाली कमी होतात, ज्याचा थेट परिणाम पचनावर होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 12:10 IST2025-04-06T12:08:33+5:302025-04-06T12:10:40+5:30

Best chair for back pain relief: Sitting posture and constipation: Effects of sitting too long on bones: How to reduce back pain from sitting: Tips to avoid back pain when working at a desk: ऑफिसमध्ये बराच वेळ खुर्चीवर बसल्याने शरीराच्या नैसर्गिक हालचाली कमी होतात, ज्याचा थेट परिणाम पचनावर होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

bad habits of sitting for long time in chair back pain Constipation and bones issue how to select right chair fir sitting | ऑफिसच्या खुर्चीमुळे वाढतोय आरोग्याचा धोका! पाठदुखी-बद्धकोष्ठतेचा त्रास, हाडे होताय ठिसूळ

ऑफिसच्या खुर्चीमुळे वाढतोय आरोग्याचा धोका! पाठदुखी-बद्धकोष्ठतेचा त्रास, हाडे होताय ठिसूळ

हल्ली तरुण पिढीपासून ते अनेक वयोगटातील लोक ऑफिसमध्ये काम करतात. ८ ते ९ तास एकाच जागी काम करणे खरेतर कठीण असते.सतत होणाऱ्या मिटिंग, प्रेझेटेशन्स आणि स्क्रीन पाहून डोळ्यांची आणि डोक्याची वाट लागते.(Tips to avoid back pain when working at a desk) यामुळे आपल्याला जितका शारीरिक त्रास होतो तितकाच मानसिक ताण देखील सहन करावा लागतो. (Effects of sitting too long on bones)
बदलेल्या जीवनशैलीनुसार सतत एकाच जागी बसून काम करणे, कामाच्या बदलेल्या वेळी, चहा-कॉफी आणि अपुरी झोप, मानसिक ताण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(Health problems caused by sitting in wrong posture) हल्ली वर्क फ्रॉर्म होममुळे देखील कामाचा ताण वाढला आहे. घर आणि ऑफिस या दोघांची कसरत होते. पण डिजिटल युगात जवळपास प्रत्येक जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कामाचे स्वरुप बैठे असते. जास्त वेळ खुर्चीवर बसण्यात जातो.(Ideal sitting position to prevent constipation) घरुन काम करा किंवा ऑफिसमधून अनेक तास सलग खुर्चीवर बसणे आपण टाळू शकते. रोज इतके तास सलग बसून काम करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ऑफिसमध्ये बराच वेळ खुर्चीवर बसल्याने शरीराच्या नैसर्गिक हालचाली कमी होतात, ज्याचा थेट परिणाम पचनावर होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसारखी सडपातळ कंबर हवी तर रोज सकाळी करा 'असा' व्यायाम, पाहा बदल

1. शारीरिक हालचालींचा अभाव-सतत एका जागी बसल्याने आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते, त्यामुळे मल बाहेर टाकण्याची प्रक्रिया कमी होते. 
2. पाणी कमी पिणे- ऑफिसमध्ये कामात गुंतल्यामुळे अनेकजण पुरेसे पाणी पित नाहीत, ज्यामुळे मल कोरडा आणि कठीण होतो. 
3. चुकीचा आहार- कमी प्रमाणात फायबरचे पदार्थ आणि जास्त प्रमाणात जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. 
4. बसण्याची चुकीची पद्धत- चुकीच्या बसण्याच्या पद्धतीने पचन प्रक्रियेला अडथळा येऊ शकतो.  
5. स्ट्रेस आणि दडपण- मानसिक तणावामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. 

">


      बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी - 
दर ३०-४५ मिनिटांनी उठून चाला: लहानसे स्ट्रेचिंग किंवा चालणे आतड्यांची हालचाल सुधारते.
पुरेशी पाणी प्या: दिवसाला किमान २-३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
फायबरयुक्त आहार घ्या: भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असावा.
कॅफिन आणि जंक फूड कमी करा: जास्त प्रमाणात चहा, कॉफी आणि जंक फूडमुळे बद्धकोष्ठता वाढू शकते.
योगासने आणि व्यायाम: नियमित कंबर व पोटासाठी योगासने केल्यास पचनसंस्था सुधारते.

6. कोणती खुर्ची वापरावी?
• Ergonomic Chair (पाठीसाठी आधार देणारी)
• Adjustable Height आणि Lumbar Support असलेली खुर्ची
• Seat Cushion जास्त हार्ड किंवा जास्त सॉफ्ट नसावी
• डेस्कच्या उंचीनुसार खुर्चीची उंची अ‍ॅडजस्ट करता यायला हवी
 

Web Title: bad habits of sitting for long time in chair back pain Constipation and bones issue how to select right chair fir sitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.