कंबरदुखी ही आजकाल फारच सामान्य समस्या झाली आहे. सतत बसून काम करणे, चुकीची बसण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव किंवा अचानक वजन उचलणे यामुळे कंबरदुखीचा त्रास वाढतो. औषधांवर अवलंबून न राहता, काही पारंपरिक आणि घरगुती उपायांनीही हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. (Back pain making everyday life difficult? try these effective home remedies for lasting relief)विशेष म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध असणार्या गोष्टींमधून हे उपाय करता येतात.
कंबरदुखीवर गरम मीठाची पोटली हा अतिशय जुना आणि प्रभावी उपाय आहे. एका कढईत जाडं मीठ गरम करून ते कापडात बांधून कंबरेवर हलक्या हाताने शेक दिल्यास स्नायूंमधील ताण कमी होतो आणि वेदना हलक्या होतात. हा शेक दिवसातून एकदा केल्यास चांगला फायदा दिसतो. लसूण आणि तीळाच्या तेलाचा वापरही कंबरदुखीसाठी रामबाण मानला जातो. तिळाच्या तेलात ठेचलेला लसूण मंद आचेवर गरम करून हे तेल कोमट झाल्यावर कंबरला मालीश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो. नियमित वापराने कडकपणा कमी होतो. अजून एक वेगळा आणि पारंपरिक उपाय म्हणजे आल्याचा वापर. आल्याचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यास शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच आल्याचा काढा पिण्याने शरीराला उब मिळते आणि वेदना कमी होण्यास हातभार लागतो.
मेथी दाण्यांचा उपयोगही कंबरदुखीसाठी खूप फायदेशीर ठरतो. रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी ते चावून खाल्ल्यास किंवा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीरातील सूज आणि वेदना कमी होतात. हा उपाय विशेषतः सांधेदुखी आणि कंबरदुखीसाठी उपयुक्त आहे. खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून त्याने मालीश करणं हा देखील एक पारंपरिक उपाय आहे. यामुळे स्नायूंना थंडावा आणि आराम मिळतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास झोपही चांगली लागते आणि वेदना कमी होतात.
याशिवाय हळदीचं दूध पिणं हा देखील एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. हळदीतील गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून पिणं फायदेशीर ठरू शकतं. हे सर्व उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित असले तरी, कंबरदुखी खूप वाढली असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. घरगुती उपायांसोबत योग्य व्यायाम, बसण्याची योग्य पद्धत आणि नियमित हालचाल याकडेही लक्ष दिल्यास कंबरदुखीपासून दीर्घकाळ आराम मिळू शकतो.
Web Summary : Back pain is common; home remedies offer relief. Heat packs with salt, garlic-infused sesame oil massage, ginger, fenugreek, and turmeric milk ease pain. Maintain posture; consult a doctor if pain persists.
Web Summary : पीठ दर्द आम है; घरेलू उपचार से राहत मिलती है। नमक की पोटली से सेंक, लहसुन युक्त तिल के तेल की मालिश, अदरक, मेथी और हल्दी दूध दर्द को कम करते हैं। मुद्रा बनाए रखें; दर्द बने रहने पर डॉक्टर से सलाह लें।