'हसतील त्याचे दात दिसतील' ही म्हण आपल्याकडे फारच प्रसिद्ध आहे. पण जर हसल्यावर दात सुंदर दिसत नसतील किंवा दातांवर पिवळा थर साचलेला असेल तर ते दिसताना विचित्रच दिसते. अशा पिवळ्या, अस्वच्छ खराब दातांमुळे आपली सुंदर स्माईल देखील बिघडते. दात पांढरेशुभ्र, स्वच्छ आणि चमकदार असतील तरच चांगले दिसतात. दातांवर पिवळा थर साचणे, दात अस्वच्छ असणे किंवा हिरड्यांचे त्रास होणे यांसारख्या समस्या फारच कॉमन झाल्या आहेत. कॉफी-चहा, तेलकट पदार्थ, चुकीची ब्रशिंग पद्धत किंवा अनियमित स्वच्छतेमुळे दातांचा नैसर्गिक पांढरेपणा हरवतो आणि दात पिवळसर अस्वच्छ दिसू लागतात(ayurvedic tooth powder for teeth whitening).
दातांवरील पिवळा थर आणि अस्वच्छपणा हटवून ते पुन्हा पहिल्यासारखे पांढरेशुभ्र, चमकदार करण्यासाठी घरगुती दंतमंजन फायदेशीर ठरू शकते.नैसर्गिक दंतमंजन केवळ दातांवरील पिवळा थर काढून टाकून त्यांना स्वच्छ आणि सफेद बनवत नाही, तर ते हिरड्यांना मजबूत करते आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासही मदत करते. नुकतेच, प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका खास (natural teeth whitening ayurveda tips) आयुर्वेदिक दंतमंजनाबद्दल माहिती दिली आहे. डॉक्टर जैदी यांचे म्हणणे आहे की, हे मंजन दातांशी संबंधित अनेक समस्या एकाच वेळी दूर करू शकते. आणखी विशेष गोष्ट म्हणजे, तुम्ही हे मंजन घरीच अगदी सहजपणे तयार करु शकता. दंतमंजन तयार करण्याची पद्धत (how to whiten teeth naturally at home) आणि हे दंतमंजन दातांसाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते ते पाहूयात...
घरगुती दंतमंजन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
घरगुती दंतमंजन तयार करण्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाची पाने, त्रिफळा, लवंग, आणि सैंधव मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
घरगुती दंतमंजन कसे तयार करावे ?
१. जांभूळ बियांची पावडर :- सर्वात आधी, जांभळाच्या सुकलेल्या बिया स्वच्छ धुवून वाळवा. त्यांना हलके भाजून घ्या आणि नंतर त्यांची बारीक पूड तयार करा. (तुम्ही हवे असल्यास, बाजारातूनही जांभूळ बियांची पावडर विकतही आणू शकता.)
२. जांभूळ पानांची पावडर :- याच पद्धतीने, जांभळाची पाने वाळवून त्यांचीही बारीक पूड बनवून घ्या.
३. पावडर मिक्स करा :- या दोन्ही पावडर (जांभूळ बिया आणि जांभूळ पाने) एकत्र करा आणि व्यवस्थित मिसळा.
४. इतर घटक मिसळा :- आता या मिश्रणात १ चमचा त्रिफळा पावडर, १ चमचा लवंग पावडर आणि १ चमचा सैंधव मीठ मिसळा.
इतके करताच तुमचे आयुर्वेदिक दंतमंजन तयार होईल. हे मंजन कोणत्याही काचेच्या बाटलीत भरून स्टोअर करुन ठेवा.
PCOS असताना वेटलॉस करणे होते कठीण! करा फक्त ५ बदल - वजन उतरेल झरझर...
जिरेही तापदायक! 'या' ६ समस्या असतील तर महिलांनी अजिबात खाऊ नयेत जिरे...
हे घरगुती दंतमंजन वापरण्याचे फायदे...
१. जांभळाच्या बियांची पावडर :- डॉक्टर जैदी सांगतात, यात असलेले अँटीऑक्सिडंट्स बॅक्टेरियाची वाढ थांबवतात आणि कॅव्हिटी होण्यापासून बचाव करतात.
२. जांभळाची पाने :- यात असलेले नैसर्गिक अॅस्ट्रिंजंट गुणधर्म हिरड्यांना मजबूत करतात आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव कमी करतात.
३. त्रिफळा :- हे प्लाक तयार होण्यास प्रतिबंध करते आणि हिरड्यांची सूज कमी करण्यास मदत करते.
४. लवंग :- लवंगमध्ये असलेले युजेनॉल तोंडाची दुर्गंधी आणि दातांची संवेदनशीलता कमी करते.
५. सैंधव मीठ :- सैंधव मीठ दातांवरील पिवळेपणा काढून टाकते आणि दातांचा नैसर्गिक पांढरेपणा परत आणते.
या दंतमंजनाचा वापर कसा करावा ?
रोज थोडीशी पावडर घ्या आणि बोटाच्या मदतीने किंवा मऊ ब्रशने दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने सुमारे २ मिनिटे मसाज करा. त्यानंतर चूळ भरून टाका.डॉक्टर जैदी सांगतात, या पावडरच्या नियमित वापराने तुम्हाला जवळपास ६ ते ८ आठवड्यांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. एकदा चांगला परिणाम दिसल्यानंतर, तुम्ही ते आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरले तरी पुरेसे आहे.
