Join us

सतत तोंड येतं, फोडांमुळे खाण्याचे हाल? सोपा आयुर्वेदिक उपाय- तोंडाचा अल्सर होईल बरा, मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2025 16:06 IST

tondyat phoda upay in Marathi: mouth ulcer ayurveda treatment: simple cure for mouth blisters: तोंडाच्या अल्सरवर उपचार म्हणून आपण अनेक औषधे खातो परंतु त्याचा देखील विपरीत परिणाम होतो. अशावेळी काही आयुर्वेदिक उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल.

शरीरातील उष्णता वाढली, औषधे जास्त प्रमाणात खाल्ली किंवा इतर अनेक कारणांमुळे आपल्याला तोंड येते.(Mouth ulcers) इतकेच नाही तर तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे, जिभेला लाल फोड येणे यांसारखे अनेक त्रास आपल्याला छळतात.(tondyat phoda upay in Marathi) तोंड आल्यामुळे आपल्याला नीट खाता पिता येत नाही. ब्रश करताना किंवा पाणी पिताना देखील त्रास होतो. तोंड येण्याची अनेक कारणे आहेत. (Ayurvedic remedy for mouth ulcers) तोंडाच्या आता लाल आणि पांढऱ्या रंगाचे व्रण तयार होतात ज्यामुळे सतत जळजळ, वेदना आणि वारंवार काही तरी  टोचतय असे वाटू लागते.(simple cure for mouth blisters) तोंडाच्या अल्सरवर उपचार म्हणून आपण अनेक औषधे खातो परंतु त्याचा देखील विपरीत परिणाम होतो. अशावेळी काही आयुर्वेदिक उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल. 

झरझर वाढणारे बीपी राहिल नियंत्रणात! आठवड्याभरात 'इतके' मिनिटे करा व्यायाम, झोपही लागेल शांत

निर्गुंडीची पाने ही तोंड येण्यावर बहुगुणी मानली जातात. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून यामध्ये दाहक-विरोधी वेदनाशामक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असलतात. ज्यामुळे शरीराच्या अनेक व्याधीवर उपचार करता येतो. निर्गुंडीची पाने तोंडाच्या अल्सरसाठी कशी वापरावी पाहूया. 

निर्गुंडीची पाने कशी वापरावी? 

४ ते ५ निर्गुंडीची पाने घेऊन ती नीट धुवून घ्या.  ही पाने ग्लासभर पाण्यात घाला आणि उकळवा. पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करुन गाळून घ्या.  दिवसातून २ ते ३ वेळा या कोमट पाण्याने गुळणा करा. असे केल्याने अल्सरच्या जळजळीपासून आणि वेदनांपासून लगेच आराम मिळू शकतो. तसेच या पाण्याने गुळणा केल्यास घशातील वेदना आणि सूज कमी होते. तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते. 

मुलं शाळेत जाताना रडतात-घाबरतात? ५ गोष्टी करा, मुलं रोज आनंदानं जातील शाळेत-छान रमतील

फायदा कसा होतो? 

निर्गुंडीची पाने शरीरासाठी फायदेशीर आहेत. या पानांमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे घशातील सूज आणि वेदना कमी करतात. याच्या पाण्याने गुळण्या केल्याने अल्सरवर थंडावा मिळतो, त्यामुळे लवकर आराम मिळतो. तोंडाच्या दुर्गंधीवर नैसर्गिक माउथवॉश म्हणून हे काम करते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स