आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास देत (Banyan leaves for knee pain) असे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील गुडघेदुखीची समस्या सतावते. गुडघेदुखी, गुडघ्यांना सूज येणे यामुळे बसताना, उठताना त्रास होतो सोबतच, काहीवेळा चालणे - फिरणेही अवघड होऊन जाते. गुडघेदुखीची ही समस्या वाढत्या वयामुळे, सांध्यांवरचा ताण किंवा लाईफस्टाईलमधील बदल यांसारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकते(Banyan leaves are cure for knee swelling and stiffness).
गुडघेदुखीच्या या समस्येकडे वेळीच योग्य लक्ष दिले नाही तर भयंकर त्रास सहन करावा लागतो. गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. या उपायांमुळे काहीवेळा गुडघेदुखीच्या समस्येपासून थोडा आराम मिळतो, तर काहीवेळा काहीच उपयोग होत नाही. गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती, आयुर्वेदिक उपायांमध्ये वडाच्या झाडांची पाने अतिशय गुणकारी ठरतात. आयुर्वेदानुसार वडाच्या पानांमध्ये सूज आणि वेदना कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते. यासाठीच गुडघेदुखीवर (Banyan leaves for knee pain) घरगुती औषधी उपाय म्हणून वडाच्या पानांचा खास उपचार नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. गुडघेदुखीच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी वडाच्या पानांचा हा अनोखा आणि आयुर्वेदिक उपाय कसा करावा ते पाहूयात.
गुडघेदुखीवर वडाच्या झाडांच्या पानांचा खास उपाय...
आयुर्वेदिक डॉक्टर कपील पारीक यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीनुसार, गुडघेदुखी व गुडघ्यांवरील सूज कमी करण्यासाठी वडाच्या झाडाची पाने अतिशय गुणकारी ठरतात. हा खास घरगुती, पारंपरिक उपाय करण्यासाठी आपल्याला १ वाटी मोहरीचे तेल, ४ ते ५ वडाची पाने, १/२ टेबलस्पून हळद इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
मूग-तूर-हरबरा-कोणती डाळ किती वेळ पाण्यात भिजवून शिजवली तर होत नाही गॅस-पित्ताचा त्रास?
नेमका उपाय काय आहे?
डॉ. पारीक यांनी सांगितले की, सर्वात आधी तव्यावर मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात एक चिमूटभर हळद घाला. त्यानंतर, वडाची ताजी पाने या गरम तेलात काही सेकंदांसाठी गरम करून घ्या, जेणेकरून ती मऊ होतील आणि त्यातील औषधी गुणधर्म सक्रिय होतील. नंतर ही गरम पाने काळजीपूर्वक काढून घ्या, आणि ती थोडी थंड झाल्यावर गुडघ्यांवर ठेवा. त्यानंतर एका सुती कापडाने ती बांधून घ्या. हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. हा उपाय गुडघ्यांवरील सूज कमी करण्यासाठी, सांध्यांचे अवघडलेपणा दूर करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतो.
दीपिका- कतरीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते केसांना करा पोटली मसाज! आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय...
वडाच्या झाडांच्या पानांमध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे सूज कमी करणारे (anti-inflammatory) आणि वेदना दूर करणारे (pain-relieving) असतात. हळद आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण या उपचाराला आणखी प्रभावी बनवते, कारण हे दोन्ही पदार्थ नैसर्गिकरित्या अँटीसेप्टिक आणि वेदना कमी करणारे आहेत. डॉ. पारीक यांनी असेही सांगितले की, हा उपचार पूर्णपणे सुरक्षित आहे आणि याचा कोणताही दुष्परिणाम नाही. परंतु, जर वेदना खूप जास्त असतील किंवा जुना संधिवाताचा त्रास असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
गुडघेदुखीवर हा उपाय कसा आहे असरदार...
१. वडाच्या झाडाची पाने :- वडाच्या झाडाच्या पानांत नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म असल्यामुळे गुडघेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
२. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल गरम करून लावल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यातील कडकपणा कमी होतो.
३. हळद :- हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांध्यांची सूज व वेदना कमी होतात.