थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकला, नाक चोंदण्याचा त्रास सर्वसाधारणपणे होतोच. हवामानातील बदल, ओलसरपणा आणि थंडगार वारा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून नाक बंद होणे, शिंका, घशात खवखव आणि थकवा जाणवतो. नाक बंद झाल्यास श्वास घेणे, जेवण करणे, किंवा शांत झोपणेही कठीण होते. या त्रासातून त्वरित आराम (best kadha for cold and congestion) मिळवण्यासाठी अनेकदा आपण बाजारातील नेझल स्प्रे किंवा औषधांचा आधार घेतो, पण त्यांचे परिणाम तात्पुरते असतात. अशावेळी तात्काळ आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेला गरम वाफाळता काढा (Ayurvedic Kadha) अत्यंत फायदेशीर उपाय मानला जातो. घरच्याघरीच सहज तयार होणारा हा काढा शरीराला ऊब देतो, कफ मोकळा करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो(Ayurvedic remedies for blocked nose).
शरीराला नैसर्गिकरित्या आतून मजबूत करून, नाक चोंदण्याच्या समस्येवर मुळापासून उपाय करण्यासाठी, आयुर्वेदिक काढा हा एक पारंपरिक आणि फायदेशीर घरगुती उपाय आहे. आलं, तुळस आणि काळीमिरी यांसारख्या उष्ण आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण घटकांपासून तयार केलेला काढा फक्त चोंदलेले नाकच मोकळे करत नाही, तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून इतर लहान - सहान संसर्गाशी लढण्यास मदत करते. थंडी-पावसाळ्यातील सर्दी-खोकला आणि नाक चोंदण्याच्या (home remedies for blocked nose) समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हा आयुर्वेदिक काढा कसा (how to clear blocked nose at home) तयार करायचा ते पाहूयात..
चोंदलेले नाकं, घशाची खवखव यासाठी खास घरगुती काढा...
घरच्याघरीच आयुर्वेदिक काढा तयार करण्यासाठी आपल्याला १ कप पाणी, १ इंच आल्याचा छोटा तुकडा (आलं किसून घेतलेलं), ५ ते ६ तुळशीची पाने, ४ ते ५ काळीमिरीची बारीक पूड, १ टेबलस्पून मध (चवीनुसार) इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
डायबिटीस असेल तर गव्हाच्या नको 'या' पिठाच्या चपात्या खा! शुगर वाढण्याचं टेंशनच विसरा, जेवा पोटभर...
हिवाळ्यात घशाची खवखव- सर्दी - खोकल्यावर नागवेलीच्या पानांचा रामबाण उपाय - एकदाच करा मिळेल आराम...
घरगुती काढा तयार करण्याची सोपी कृती :-
नाक चोंदण्याची अनेक कारण असतात त्यापैकीच, सर्दी-पडसं, ॲलर्जी, धूळ, प्रदूषण किंवा विषाणूजन्य संसर्ग ही मुख्य कारण आहेत. अशावेळी नाकाच्या आत जमा झालेली सर्दी सुकते किंवा जास्त प्रमाणात तयार होते, त्यामुळे नाक चोंदणे आणि श्वास घेणे कठीण होते.
एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात किसलेलं आलं, तुळस आणि काळीमिरी पूड घाला. सर्व औषधी गुणधर्म पाण्यामध्ये चांगले मिसळले जावेत यासाठी, मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण गाळून घ्या. कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध मिसळून प्या. हा काढा दिवसातून दोन वेळा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी पिणे अधिक परिणामकारक आणि फायदेशीर ठरते.
हा घरगुती आयुर्वेदिक काढा पिणे आहे फायदेशीर...
हा काढा शरीरातील उष्णता वाढवतो आणि सर्दीमुळे चोंदले नाक उघडण्यास मदत करतो. हा काढा कफ पातळ करतो आणि घशाची जळजळ कमी करतो. यातील औषधी गुणधर्म नाक आतून स्वच्छ करते, ज्यामुळे त्वरित आराम मिळतो. हा काढा सलग २ ते ३ दिवस प्यायल्याने फक्त नाकच साफ होत नाही, तर खोकला आणि घसा खवखवणे देखील कमी होते.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
हा काढा पिण्याचे फायदे...
१. आलं :- आल्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी घटक कफ, सर्दी मोकळी करून नाक चोंदल्याचे प्रमाण आणि सर्दी कमी करतात.
२. तुळस :- तुळशीमध्ये असलेले नैसर्गिक अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म घशातील खवखव आणि संसर्ग कमी करतात.
३. काळीमिरी :- काळीमिरीत पिपरीन फार मोठ्या प्रमाणावर असते, यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून घशातील कफ बाहेर काढण्यास मदत होते.
४. मध :- मधाच्या नैसर्गिक अँटीसेप्टिक तसेच सौम्य गोडव्याने घशाला आराम मिळतो आणि खोकल्याची तीव्रता कमी होते.
Web Summary : Suffering from a cold? This Ayurvedic kadha, made with ginger, tulsi, and black pepper, offers relief from congestion and boosts immunity. A traditional home remedy to soothe your throat and clear your blocked nose naturally.
Web Summary : सर्दी से परेशान हैं? अदरक, तुलसी और काली मिर्च से बना यह आयुर्वेदिक काढ़ा, जमाव से राहत देता है और प्रतिरक्षा को बढ़ाता है। आपके गले को आराम देने और स्वाभाविक रूप से बंद नाक को साफ़ करने के लिए एक पारंपरिक घरेलू उपाय।