वय वाढू लागलं की अनेक दुखणे वर येते. वाढत्या वयाबरोबर शरीरातील हाडे, स्नायू आणि सांधे यांची ताकद कमी होते. सगळ्यात जास्त याचा परिणाम आई-आजीच्या पायांवर दिसून येतो.(Health Tips) पाय सुजणे, गुडघे दुखणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी याचा त्रास अधिक होतो.(swollen feet home remedies) सतत एकाच जागी बसून राहणे, रक्ताभिसरण न होणे, वॉटर रिटेन्शन, थायरॉईड किंवा मधुमेहासारख्या गंभीर आजारामध्ये पाय सुजतात. (Ayurvedic oil for swollen feet)बरेचदा आपण या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. पण या समस्येवर मात करण्यासाठी काही खास घरगुती आयुर्वेदिक तेलाने पायांची मालिश केल्यास सूज कमी होण्यास मदत होईल.(best Ayurvedic treatment for foot pain) अनेकदा वजन वाढले की, त्याचा आपल्या पायांवर देखील जोर पडतो. जर आपलेही पाय वारंवार सुजत असतील तर प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सांगितलेल्या तेलाने मालिश करुन बघा.
ओठ फुटतात कारण ‘या’ दोन व्हिटामिन्सची कमतरता, ५ पदार्थ खा- ओठ होतील मऊ गुलाबी
श्वेता शाहने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्या म्हणतात की, पायांची सूज कमी करण्यासाठी कलोंजीचे तेल अतिशय प्रभावी आहे. हा आयुर्वेदिक उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणताही दुष्परिणाम होणार नाही. हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा मध, एक चमचा कलोंजी तेल मिसळून पायांच्या सुजलेल्या भागावर मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि सूज हळूहळू कमी होण्यास मदत होईल. तसेच कोमट पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब आणि मध मिसळा. याचा शेक घेतल्याने सूज कमी होईल.
कलोंजीच्या तेलात दाहक- विरोधी गुणधर्म असतात, जे नैसर्गिकरित्या शरीरातील दाह कमी करतात. तसेच रक्ताभिसरण सुधारुन पायांमध्ये साचलेले पाणी किंवा द्रव काढून टाकतात. जर पाय वारंवार सूजत असतील तर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. किडनी, हृदय किंवा थायरॉईड सारख्या गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते.