हिवाळा ऋतू येताच, अनेक लहान - सहान आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतात. हिवाळ्यात होणाऱ्या या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास फारच कॉमन आहे. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने बरेचजणांना सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास सतावतो. हिवाळ्यात सांधे आखडतात, रक्तप्रवाह मंदावतो आणि वेदना वाढतात. या वेदना कमी करण्यासाठी बाजारातील वेदनाशामक बाम वापरले जातात, पण त्याचा परिणाम तात्पुरता असतो इतकेच नाही तर त्यात अनेक प्रकारचे केमिकल्स देखील असतात. अशा परिस्थितीत, केमिकलयुक्त तेलांपेक्षा घरच्या घरी तयार केलेले नॅचरल पेन-रिलीफ तेल अधिक फायदेशीर आणि असरदार ठरते. या वेदनांपासून कायमस्वरूपी आराम मिळवण्यासाठी आणि सांध्यांना आतून बळकटी देण्यासाठी आयुर्वेदिक नैसर्गिक तेल तयार करता येते(Ayurvedic Oil for Joint Pain During Winter).
स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून, हिवाळ्यातील सांधेदुखीवर रामबाण उपाय ठरणारे मालिश तेल कसे करायचे, याची सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. हे तेल फक्त वेदनाच कमी करत नाही, तर सांध्यांमधील सूज आणि आखडलेपणा दूर करून त्यांना लवचिकता देण्यास मदत करते. हिवाळ्यात होणारी सांधेदुखी किंवा (ayurvedic oil for joint pain during winter) गुडघेदुखीवर कोणते घरगुती तेल असरदार ते पाहूयात.
हिवाळ्यात होणारी सांधेदुखी किंवा गुडघेदुखीवर घरगुती तेल असरदार...
गुडघे आणि सांधेदुखीसाठी घरी बनवलेले तेल पूर्णपणे नैसर्गिक असते आणि त्याचे कोणतेही साइड इफेक्ट्स दुष्परिणाम होत नाहीत. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला मोहरीचे तेल, लसूण, ओवा, मेथीचे दाणे इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एक कप मोहरीच्या तेलात ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, एक चमचा ओवा आणि एक चमचा मेथी दाणे घाला. हे मिश्रण मंद आचेवर तोपर्यंत गरम करा, जोपर्यंत लसूण हलका तपकिरी होत नाही. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
एकदा मळून ठेवलेली कणीक फ्रिजमध्ये किती दिवस ठेवावी? तज्ज्ञ सांगतात, इतक्या वेळेनंतर होते विषासमान...
फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...
हे घरगुती तेल वापरण्याची पद्धत...
गुडघेदुखी, सांधेदुखी मुळापासून कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने हलक्या हातांनी १० मिनिटे मालिश करा आणि नंतर कापडाने झाकून बांधून ठेवा. हे तेल सांध्यांमधील सूज आणि आखडलेपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
या घरगुती तेलासोबतच, हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीसाठी खोबरेल तेल आणि तिळाचे तेल देखील तितकेच फायदेशीर ठरते. खोबरेल तेलाच्या हलक्या मालिशने स्नायूंना उष्णता मिळते आणि स्नायूंमधील आखडलेपणा कमी करते. तिळाच्या तेलामधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 'ई' असते, जे हाडे आणि सांध्यांसाठी टॉनिकचे काम करते. जर दुखणे जुने असेल, तर मालिशसोबत हलकी स्ट्रेचिंग आणि गरम पाण्याचा शेक देखील द्यावा. तसेच, रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसावे, जेणेकरून शरीरात व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता होणार नाही.
