Ayurvedic tips whitening yellow teeth : वेगवेगळ्या कारणांनी पिवळे झालेले दात आणि श्वासांची दुर्गंधी यामुळे नक्कीच तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तसेच चारचौघात हसण्या आणि बोलण्याची समस्याही निर्माण होते. या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. पिवळे दात चमकदार करायचे असतील आणि श्वासांची दुर्गंधी दूर करायची असेल तर आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक मंजन सांगणार आहोत. हे उपाय नॅचरल असल्याने यांचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत.
कडुलिंबाची फांदी किंवा पावडर
कडुलिंबाला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅं-इन्फ्लेमेटरी गुण असतात. अशात कडुलिंबाच्या फांदी दात घासल्यास किंवा कडूलिंबाच्या पानांपासून मंजन तयार करा. या मंजनाने नियमितपणे दात स्वच्छ करा. पिवळ्या दातांची आणि दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
रात्री लवंग चघळा
लवंग तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी फार प्रभावी उपाय आहे. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे दातांची आणि तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होईल. यासाठी रात्री झोपण्याआधी एक लवंग चघळा किंवा लवंगाचं तेल पाण्यात टाकून या पाण्याने गुरळा करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
सैंधव मिठाने दात घासा
एक चमचा मोहरीच्या तेलात अर्धा चमचा सैंधव मीठ टाकून दातांवर हलक्या हाताने घासा. याने पिवळे दात चमकदार होतील आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा येणार नाही.
हळद आणि खोबऱ्याचं तेल
हळद आणि खोबऱ्याचं तेलही तुमची पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. हे एक प्रभावी आयुर्वेदिक मंजन आहे. यासाठी एक चमचा खोबऱ्याच्या तेलात अर्धा चमचा हळद टाकून दातांवर बोटाच्या मदतीने घासा. नंतर कोमट पाण्याने गुरळा करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
पदीन्याच्या पाण्याने गुरळा करा
पदीन्याची ताजी पाने चावून खावीत किंवा पदीन्याचं तेल पाण्यात टाकून गुरळा करावा. याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल आणि दात चमकदारही होतील.