हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की, वातावरणातील गारवा वाढतो, आणि या बदलांमुळे आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीत थोडाफार बदल होतो. यामुळेच थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा खवखवणे किंवा आवाज बसणे यांसारख्या समस्या वरेचवर सतावतात. या सगळ्या होण्याऱ्या त्रासावर घरगुती आपण अनेक घरगुती उपाय करतोच, परंतु या घरगुती उपायांमध्ये नागवेलींच्या हिरव्यागार पानांचा एक खास उपाय असरदार ठरतो. नागवेलीची हिरवीगार पानं फक्त पूजा-अर्चा किंवा विडा तयार करण्यापूरताच वापरली जात नाहीत तर त्यात औषधी गुणधर्मांचा खजिना दडलेला असतो. ही पाने अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. त्यामुळे सर्दी-खोकला कमी करण्यासाठी, घसा मोकळा ठेवण्यासाठी, तसेच घशातील खवखव आणि सूज कमी करण्यासाठी नागवेलीची पाने अतिशय उपयुक्त ठरतात. नागवेलीच्या पानांतील कफ आणि जंतुनाशक गुणधर्मांमुळे ते हिवाळ्यातील (how to use betel leaf for throat pain) श्वसनविकारांवर एक रामबाण औषध म्हणून फायदेशीर ठरते.
नागवेलीची पाने उष्ण आणि तिखट प्रकृतीची असल्यामुळे ती छातीत जमा झालेला कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामुळे होणारा त्रास कमी होतो. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या इतर पदार्थांसोबत नागवेलीच्या पानांचा नेमका आणि योग्य पद्धतीने उपयोग कसा करायचा, जेणेकरून थंडीतील या सामान्य समस्यांवर (tips & tricks betel leaf for sore throat relief ayurvedic home remedy) तुम्ही घरच्या घरीच उपचार करू शकाल!
१. सर्दी आणि कफ बाहेर काढण्यासाठी उपाय :- हा उपाय छातीत जमा झालेला कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करतो. नागवेलीचे एक पान स्वच्छ धुवून घ्या. त्यावर १/४ चमचा ओवा आणि १/२ चमचा मध ठेवा. हे पान चांगले चावून खा. हा उपाय दिवसातून २ वेळा केल्यास कफ आणि सर्दीपासून त्वरित आराम मिळतो.
२. घसा खवखवणे आणि आवाज बसणे :- या उपायामुळे घशातील सूज कमी होते आणि वेदना दूर होतात. पाण्यात नागवेलीची पाने बारीक तुकडे करून घाला आणि ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. हा काढा गाळून कोमट होऊ द्या. या कोमट काढ्यात चिमूटभर काळे मीठ/सैंधव मीठ मिसळा. हे पाणी गुळण्या करण्यासाठी वापरा. दिवसातून ३ ते ४ वेळा गुळण्या केल्यास घसादुखी आणि खवखव कमी होते.
३. लहान मुलांमधील सर्दी-खोकल्यासाठी :- लहान मुलांसाठी हा उपाय अत्यंत सौम्य आणि सुरक्षित मानला जातो. अर्ध्या नागवेलीच्या पानाला तव्यावर ठेवून हलके गरम करा. या पानाचा रस काढा किंवा पान बारीक कुस्करून घ्या. यामध्ये १ चमचा मध आणि आल्याचे २ ते ३ थेंब मिसळून मुलांना दिवसातून एकदा चाटण म्हणून द्या. लहान मुलांना देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
४. छातीतील जडपणा कमी करण्यासाठी :- नागवेलीची पाने गरम करून छातीवर लावल्यास छातीतील जडपणा आणि श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो. नागवेलीच्या पानांना मोहरीचे तेल किंवा एरंडेल तेल लावून तव्यावर हलके गरम करा. गरम झालेली ही पाने सहन होईल इतकी कोमट असताना छातीवर आणि पाठीवर ठेवा. काही वेळेसाठी असे ठेवल्यास श्वासोच्छ्वास मोकळा होण्यास मदत मिळते.
