Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर करणारा ३ मसाल्यांचा खास आयुर्वेदिक उपाय, एकदा करून बघाच!

पोटाच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर करणारा ३ मसाल्यांचा खास आयुर्वेदिक उपाय, एकदा करून बघाच!

Ayurveda Home Remedies : भारतीय किचनमध्ये रोज वेगवेगळ्या मसाल्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:11 IST2025-01-10T11:11:29+5:302025-01-10T11:11:56+5:30

Ayurveda Home Remedies : भारतीय किचनमध्ये रोज वेगवेगळ्या मसाल्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

Ayurvedic home remedies to cure different stomach problem told by Ayurved Doctor | पोटाच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर करणारा ३ मसाल्यांचा खास आयुर्वेदिक उपाय, एकदा करून बघाच!

पोटाच्या वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर करणारा ३ मसाल्यांचा खास आयुर्वेदिक उपाय, एकदा करून बघाच!

Ayurveda Home Remedies : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त लाइफस्टाईलमुळे आजकाल शरीर अनेक आजारांचं घर बनत आहे. अशात लोकांना हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. मात्र, जर थोडी काळजी घेतली आणि मसाल्यांची शक्ती समजून घेतली तर अनेक आजारांना मुळापासून दूर करता येतं. घरातील काही मसाले भाजून एक खास औषध तयार करता येऊ शकतं.

भारतीय किचनमध्ये रोज वेगवेगळ्या मसाल्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात मसाले खाण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. डॉ. रॉबिन शर्मा यांच्यानुसार, बडीशेप, जीरे आणि ओवा समान प्रमाणात घेऊन तव्यावर भाजा. त्यानंतर यात आणखी एक मसाला मिक्स केला तर अनेक आजार दूर करता येऊ शकतात.

किती घ्यावे मसाले?

50 ग्रॅम बडीशेप

50 ग्रॅम जीरे

50 ग्रॅम ओवा

औषध बनवण्याची पद्धत

डॉक्टरांनुसार, वर सांगण्यात आलेले तिनही मसाले तव्यावर हलके भाजा. नंतर त्यात 20 ग्रॅम सूंठ पावडर टाका. तयार झालेलं हे मिश्रण आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतं. यात इतरही काही मसाले मिक्स करून याचा फायदा अधिक वाढवू शकता.

आयबीएसची ट्रीटमेंट

या मिश्रणात तेवढंच बेल पावडर मिक्स करा. हे एक छोटा चमचा मिश्रण दिवसातून तीन वेळा पाण्यात टाकून प्या. हा उपाय आयबीएस म्हणजे ब्लोटिंग, पोट दुखणे आणि बद्धकोष्ठता दूर करणारा बेस्ट उपाय मानला जातो.

पोट होईल हलकं

जर या मिश्रणात बेल पावडरच्या जागी हिरड्याचं पावडर टाकलं तर बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. अपचन आणि पोटात गॅस होत असेल तर यात सैंधव मीठ मिक्स करून खाऊ शकता. अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी यात वेलचीही टाकू शकता.

लठ्ठपणा होईल दूर

संधिवात, लठ्ठपणा, पीसीओडी, पीसीओएसनं ग्रस्त लोकही हा उपाय करू शकतात. यासाठी या मिश्रणात मेथीचे दाणे मिक्स करा आणि नंतर पाण्यासोबत प्या.

Web Title: Ayurvedic home remedies to cure different stomach problem told by Ayurved Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.