Join us

डोकेदुखी, पोटाच्या तक्रारी आणि सर्दी कफाचा त्रास? नागवेली पानाचा खास उपाय - मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 13:06 IST

Ayurvedic Home Remedies Betel Leaf : Betel Leaf Remedies for Headache, Cold, and Cough : Natural Healing with Betel Leaf : नागवेलीच्या ताज्या, हिरव्यागार, सुगंधी पानांमध्ये असंख्य औषधी गुणधर्म दडलेले असतात..

आपल्याकडे खायचे पान म्हणजेच नागवेलीच्या पानाला विशेष असे महत्व आहे. धार्मिक विधींपासून ते पारंपरिक औषधांपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी या नागवेलीच्या पानांचा वापर केला जातो. नागवेलीच्या ताज्या आणि सुगंधित पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. नागवेलीच्या पानांमध्ये (Betel Leaf Remedies for Headache, Cold, and Cough) जंतुनाशक, पाचक व शीतल गुणधर्म असून ती शरीरासाठी (Natural Healing with Betel Leaf) अनेक प्रकारे लाभदायक ठरतात. याच कारणामुळे नागवेलीचे पान हे फक्त खाण्यासाठीच म्हणून नाही तर एक नैसर्गिक औषध म्हणूनही ओळखले जाते. नागवेलीच्या ताज्या, हिरव्यागार आणि सुगंधी पानांमध्ये असंख्य औषधी गुणधर्म दडलेले आहेत, जे शरीर व आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात(Ayurvedic Home Remedies Betel Leaf).

अनेकदा आपल्याला आरोग्याच्या लहान - सहान तक्रारी सतावतात. कधी अपचन, अ‍ॅसिडिटी, तर कधी सर्दीने नाक चोंदणे आणि डोकेदुखी यांसारख्या आरोग्याच्या समस्या हैराण करतात. अशा परिस्थितीत, आपण लगेच त्यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारची औषध किंवा गोळ्या घेतो, फारच त्रास वाटला तर लगेच डॉक्टर गाठतो. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे काहीवेळा पुरेसा वेळ नसतो किंवा सुरुवातीला आपण काही घरगुती किंवा प्राथमिक उपचार करुन पाहतो. या प्राथमिक उपचारांमध्ये, नागवेलीच्या पानांचा वापर कसा करायचा ते पाहूयात. 

नागवेलीच्या पानांचे अनेक औषधी उपचार... 

१. पोट, पचनासंबंधित समस्या व अ‍ॅसिडिटीवर उपाय :- बरेचदा आपल्याला पोटाच्या अनेक लहान - मोठ्या तक्रारी सतावतात. काहीवेळा अपचन, अ‍ॅसिडिटी होऊन पोटाशी संबंधित समस्यांमध्ये अधिकच वाढ होते, अशावेळी नागवेलीच्या पानांचा घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतो. नागवेलीच्या पानांमध्ये यूजेनॉल नावाचा नैसर्गिक औषधी घटक असतो, जो पचनसंस्थेला चालना देतो आणि अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्यास मदत करतो. पानांमधील अनेक औषधी गुणधर्म असतात, जे पोट फुगणं कमी करण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात. यासाठीच जेवणानंतर नागवेलीचं पान खाणं हा एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक उपाय मानला जातो.  पोट, पचनासंबंधित समस्या व अ‍ॅसिडिटीवर उपाय म्हणून नागवेलीच्या पानांचा वापर करण्यासाठी, एका भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन त्यात चमचाभर बडीशेप आणि नागवेलीची पान घालूंन ते पाणी उकळवून प्यायल्यास आराम मिळतो. 

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

२. सर्दी आणि कफवर औषध म्हणून :- अनेकदा घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सर्दी आणि कफचा त्रास सतावतो. एकदा सर्दी, कफ झाला की जाता जात नाही. अशा परिस्थितीत, ग्लासभर पाण्यांत तुळशीची पाने, नागवेलीची पाने, ज्येष्ठमध घालून ते पाणी उकळवून घ्यावे. नंतर हे पाणी गाळून प्यावे. यामुळे सर्दी आणि कफ सारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. ह्या काढ्यात साखर किंवा झोप आणणारी रसायने नसतात, त्यामुळे हा काढा  अधिक सुरक्षित आणि प्रभावी असा घरगुती उपाय ठरु शकतो. 

अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरू नका! WHO ने सांगितलेले 'हे' उपाय, उच्च रक्तदाब नियंत्रणात...

३. डोकेदुखी :- डोकेदुखी फारच त्रास देऊ लागली की आपल्याला अस्वस्थ वाटते. अशा परिस्थितीत, नागवेलीच्या पानांमध्ये नैसर्गिक थंडावा आणि वेदनाशामक (pain-relieving) गुणधर्म असतात. नागवेलीच ताजं पान थोडंसं गरम करून कपाळावर ठेवल्यास किंवा कोवळ्या पानांची पेस्ट करून लावल्यास, दोन्ही उपाय डोकेदुखी, ताणतणाव आणि सायनसशी संबंधित त्रास कमी करण्यात मदत करतात. हा एक सोपा आणि घरगुती उपाय असून शरीराला शांतता देणारा आणि मानसिक तणाव दूर करणारा ठरतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी