Ayurvedic Remedy For Cough at Night: वातावरणात बदल झाला की, लहान असोत वा मोठे सगळ्यांनाच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होतोच. खासकरून लहान मुलं आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये या समस्या अधिक बघायला मिळतात. यामागे बदलतं हवामान, प्रदूषण, किंवा शरीरातील वाढलेला कफ-वात दोष हे प्रमुख कारणं आहेत. अनेकांना तक्रार असते की आठवडा उलटून गेला तरी खोकला जात नाही, रात्री झोपताना नाक बंद होतं, गळा दुखतो, आणि झोप लागत नाही. उलट बेडवर पडल्यावर खोकला आणखी वाढतो. जर तुम्हालाही हे त्रास होत असतील, तर हे काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय नक्की उपयोगी ठरू शकतात.
काय सांगतात तज्ज्ञ?
जीवा आयुर्वेदाचे संचालक डॉ. प्रताप चौहान यांच्या मते, रात्री खोकला वाढणे हे हे मुख्यपणे कफ आणि वात दोषाच्या वाढीमुळे होते. दिवसा शरीर सक्रिय असल्याने श्वसनमार्ग साफ राहतो, पण रात्री आराम करताना शरीराची नैसर्गिक गती कमी होते. त्यामुळे छातीत आणि घशात कफ साचतो, आणि खोकला वाढतो. याशिवाय खोलीतील कोरडी हवा किंवा फॅनची थेट हवा गळा अधिक कोरडा करते आणि खोकला वाढवते.
रात्री खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी उपाय
कोमट पाणी प्या
संध्याकाळपासून झोपेपर्यंत अधूनमधून कोमट पाणी थोडं-थोडं प्या. याने गळा ओलसर राहतो आणि कफ सैल होतो.
शहद, हळद आणि मिरीचं मिश्रण
एक चमचा मधात चिमूटभर काळी मिरी पूड आणि चिमूटभर हळद मिसळा. झोपण्यापूर्वी हे मिश्रण चाटा. खोकला आणि घशातील जळजळ कमी होईल.
गरम पाण्याने गुरळा करा
गरम पाण्यात थोडं मीठ किंवा त्रिफळा पावडर मिसळून गुरळा करा. याने इन्फेक्शन कमी होतं आणि गळ्याची सूजही उतरते.
भाज्यांची वाफ
पाण्यात तुळशीची पानं, नीलगिरी तेल, किंवा ओवा घालून वाफ घ्या. याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि रात्री श्वास घेणं सोपं होतं.
इतरही काही उपाय
- घशावर व छातीवर गरम तूप किंवा नारळाचं तेल लावा. याने श्वासोच्छ्वास सुधारतो आणि कफ खाली बसायला मदत होते.
- झोपताना पाण्याचं भांडे बेडजवळ ठेवा किंवा ह्युमिडिफायर वापरा. याने हवा कोरडी होत नाही आणि गळा सुकत नाही.
- रात्री हलका, उबदार आहार घ्या. दुधाचे पदार्थ, दही, थंड पेय किंवा तळलेले पदार्थ टाळा. याने कफ वाढत नाही.
- थोडं आलं आणि गुळ एकत्र चावून खा. हे नैसर्गिक खोकला थांबवणारं औषध आहे.
- तुळशी, लवंग, काळी मिरी, हळद आणि आलं उकळून त्याचं काढा घ्या.
- कंठसुख काढा किंवा आयुर्वेदिक गोळ्या झोपण्यापूर्वी चोखल्याने घशातली कोरडेपणा कमी होतो.
