Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोळ्यांना रोज तूप लावण्याचे फायदे फार, आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितला तब्येतीसाठी खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:27 IST

Eye Care: तूप डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं याबाबत आयुर्वेद डॉक्टर मनीषा मिश्रा गोस्वामी यांनी काही टिप्स दिल्या आहे. 

Eye Care: सामान्यपणे सगळ्यांच्याच घरात तूप असतं. वेगवेगळे पदार्थ तुपात बनवले जातात. आयुर्वेदातही तुपाला एक औषधी मानलं जातं. म्हणूनच अनेक उपचारांमध्ये तुपाचा वापर केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तुपाचे डोळ्यांना देखील फायदे मिळतात. आजकाल स्क्रीन टाइम जास्त झाल्यानं डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या कमी वयातच होऊ लागल्या आहेत. अशात तूप डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं याबाबत आयुर्वेद डॉक्टर मनीषा मिश्रा गोस्वामी यांनी काही टिप्स दिल्या आहे. 

डोळ्यांवर लावा तूप

डॉक्टर सांगतात की, रात्री डोळ्यांवर तूप लावू शकता. जसं तुम्ही डोळ्यांना काजळ लावता तसं तूप लावा. या उपायानं डोळ्यांना फायदा मिळतो आणि डोळ्यांसंबंधी अनेक समस्याही दूर होतात.

कशी घ्याल डोळ्यांची काळजी

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांना इतरही काही उपाय सांगितले. तुम्ही जर टीव्ही किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असाल तर तुमचे तळहात काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवा आणि नंतर बाजूला करा. यानं डोळ्यांच्या मसल्सना आराम मिळतो.

सकाळी उन्ह घ्या आणि थोडा वेळा सूर्याकडे बघा. या उपायानं थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. तसेच यानं व्हिज्युअल मोटर कॉर्डिनेशनही सुधारतं. पण जास्त उन्हात सूर्याकडे बघू नका.

काही वेळ पापण्यांची उघडझाप करा. यानं ड्राय आय सिंड्रोम दूर होते, डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांच्या मसल्सही मजबूत होतात.

तसेच रात्री चंद्राकडे बघणं देखील फायदेशीर ठरतं. डॉक्टर सांगतात की, हा उपाय केल्यानं फोटोफोबिया कमी होतो. तसेच डोळ्यांना आराम मिळतो.  

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स