लघवी येणं किवा लागणं ही आपल्या शरीरातील सामान्य क्रिया आहे. अनेकदा आपण प्रवासात किंवा काही कामात असल्यावर बरेचदा लघवी थांबवून ठेवतो. (urine infection symptoms) असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. बरेचदा आपण बाहेर गेल्यानंतर लघवी येईल म्हणून पाणी कमी प्रमाणात पितो. प्रवासात वारंवार लघवी येऊ नये म्हणून पाणी पिणे टाळतात. घरातील टॉयलेट आपण वेळोवेळी आणि रोजच्या रोज साफ करतो. (Using Public toilet issue)
ऑफिस, मॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर लघवी लागली तर त्या ठिकाणाचे टॉयलेट वापरण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो.(Is it safe to sit on public toilet seats) परंतु अनेकांना पब्लिक टॉयलेट वापरण्यानंतर युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो. अशावेळी सतत खाज लागणे, पोटदुखीचा त्रास, जळजळ होते. अनेकदा हा त्रास आपल्याला काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेऊन देखील होतो. वारंवार आपल्याला हा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तुम्ही पब्लिक टॉयलेट सतत वापर असाल तर या चुका करणे टाळा.
भोपळा-सूर्यफुलाच्या बियांसह ‘या’ ६ बिया वाढवतात फर्टिलिटी-तारुण्य आणि चेहऱ्यावरचं तेज ओसरणारच नाही
कॉमन टॉयलेट वापरताना काय काळजी घ्याल
1. जर तुम्ही कॉमन टॉयलेट वापरत असाल तर ते स्वच्छ आहे की, नाही हे तपासा. तुम्ही इंग्लिश टॉयलेटचा वापर करत असाल तर ते टिश्यू पेपरने साफ करा. तसेच तुमचा प्रायव्हेट पार्टही साफ करायला विसरु नका. जर असे केले नाही तर बॅक्टेरिया मूत्रमार्गापर्यंत पोहोचू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुमची इम्युनिटी देखील तितकी स्ट्राँग असायला हवी. ज्यामुळे तुम्हाला कोणताही संसर्ग सहज होणार नाही.
2. युरिन इन्फेक्शनचा त्रास युरेथ्राच्या मार्फत होतो. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यायल्या हवं. दिवसभर हायड्रेटेड राहा. यामुळे तुम्हाला वारंवार लघवी करावी लागेल, ज्यामुळे तुमच्या मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतात. यासाठी पुरेसे पाणी प्या. फळांचा रस, ज्यूस इत्यादी पिऊ शकता.
3. तुम्हाला वारंवार लघवी रोखून ठेवत असाल तर असं करु नका. यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीस चालना मिळेल. लघवी करण्यासाठी तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू नका. तसेच लघवी पूर्णपणे रिकामे करा. लघवी थांबवून ठेवली तर तुम्हाला खाज लागणे, पोटदुखीचा त्रास, जळजळ होऊ शकते. तसेच बॅक्टेरियाचे प्रमाण वाढून संसर्ग अधिक वाढू शकतो.
4. प्रोबायोटिक्स टाळू नका. नियमितपणे प्रोबायोटिक्स घेतल्यास आतड्यांसाठी हे फायदेशीर ठरते. हे आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करते. ज्यामुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहातो. प्रोबायोटिक्स घेतल्याने तुम्हाला युटीआय होण्यापासून देखील बचाव होतो.