Ladyfinger side effects : वेगवेगळ्या भाज्या खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. बरेच लोक काही भाज्या इतरही दुसऱ्या भाज्यांसोबत खातात. पण असं करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारकच ठरतं. भेंडीची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. पण भेंडी इतर काही भाज्यांसोबत खाल्ली गेली तर आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, कोणत्या भाज्यांसोबत भेंडीची भाजी खाऊ नये.
डॉ. सलीम जैदी यांच्यानुसार, भारतीय किचनमध्ये आरोग्यासंबंधी उपाय दडलेले आहेत. अशात उन्हाळ्यात अधिक मिळणारी भेंडी थंडी असते. जर तुम्ही भेंडी खात असाल तर त्यासोबतच काही भाज्या खाणं टाळलं पाहिजे. कारण यातील फायबर, व्हिटामिन सी, व्हिटामिन के आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स इतर भाज्यांसोबत मिळून आरोग्यासंबंधी नुकसान करू शकतात.
मूळा
जर तुम्ही भेंडी खात असाल तर त्यासोबत मूळा खाणं टाळलं पाहिजे. मूळ्यामध्ये सल्फर तत्व असतात, ज्यामुळे पोटात गॅस वाढतो. भेंडी आणि मूळा दोन्ही भाज्या विरूद्ध गुणाच्या आहेत. दोन्ही भाज्या सोबत खाल्ल्यानं गॅस, अॅसिडिटी आणि स्किन अॅलर्जी होऊ शकते.
कारले
कारले आणि भेंडी सुद्धा कधीच एकत्र खाऊ नये. या दोन्ही गोष्टी पचनासाठी वेळ लागतो. अशात जर तुम्हाला आधीच पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी आणि कारले कधीच एकत्र खाऊ नये. पोटदुखी, बद्धकोष्ठता, जळजळ अशा समस्या तुम्हाला होण्याचा धोका असतो.
वांगी
वांग्यांमध्ये असे काही तत्व असतात जे शरीरात आयर्नचं अवशोषण कमी करू शकतात. वांग्यांमध्ये काही एलर्जिक तत्व असतात आणि भेंडी चिकट असते. यामुळे पचन तंत्र प्रभावित होतं. तसेच त्वचेसंबंधी समस्याही वाढू शकतात.
बटाटे
भेंडी आणि बटाटे सुद्धा एकत्र खाणं टाळलं पाहिजे. कारण भेंडीमध्ये ऑक्सालेट नावाचं तत्व असतं, जे किडनी स्टोनचं कारण ठरतं. भेंडीमध्ये फायबर अधिक असल्यानं पचनक्रिया सुद्धा स्लो होते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, तर भेंडीमध्ये फायबर जास्त असतं. दोन्ही जर एकत्र खाल्ल्या तर ब्लड शुगर असंतुलित होऊ शकते आणि लठ्ठपणा वाढू शकतो.
फूलकोबी
फूलकोबी आणि भेंडी सुद्धा कधी सोबत खाऊ नये. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्या तर पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. तसेच फूलकोबीमधील तत्वांमुळे आयोडिनच्या अवशोषणात अडथळा येतो, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथींच्या कामात समस्या येते.