Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

Health Tips For Monsoon: पाव आणि ब्रेड यांच्यापासून तयार होणारे पदार्थ कितीही चवदार असले तरी पावसाळ्यात ते जपूनच खायला हवे, असं डॉक्टर सांगत आहेत..(side effect of eating bread and other bakery product in monsoon)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 19:37 IST2025-06-27T17:05:50+5:302025-06-27T19:37:21+5:30

Health Tips For Monsoon: पाव आणि ब्रेड यांच्यापासून तयार होणारे पदार्थ कितीही चवदार असले तरी पावसाळ्यात ते जपूनच खायला हवे, असं डॉक्टर सांगत आहेत..(side effect of eating bread and other bakery product in monsoon)

avoid bread and other bakery product in monsoon, side effect of eating bread and other bakery product in monsoon | डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

Highlightsरोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, कर्करोगग्रस्त रुग्ण यांना या बुरशीजन्य आजारांचा धोका जास्त असतो.

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

ओपीडीत जुलाबाच्या पेशंटची गर्दी होत आहे. सामान्यत: जुलाब एकदम बंद होण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं कमी व्हावे. आधी संसर्ग कमी व्हावा, मग अंतर्गत सुज कमी व्हावी आणि पोट जागेवर यावे. अशा उपचाराच्या पायऱ्या असतात. पण या पावसाळ्याच्या सिझनमधले जुलाब उपचारांना जलद दादच देत नाहीये असं दिसतंय.. अनेक पेशंटशी चर्चा केल्यानंतर या प्रत्येकाच्या खाण्यात कधीतरी ‘पाव’ आला असल्याची माहिती मिळाली.. यामागचं कारण म्हणजे वातावरण दमट असल्यानं पाव किंवा ब्रेड अशा पदार्थांवर सामान्यपणे Aspergillus, Penicillium,Rhizopus यासारख्या बुरशी वाढतात. या बुरशी दिसायला हिरवट, काळसर, पांढुरक्या किंवा निळसर बारीक ठिपक्यांसारख्या दिसतात आणि त्या पाव खराब करतात. कधी कधी त्या डोळ्यांना चटकन दिसतही नाहीत. (avoid bread and other bakery product in monsoon)

 

असा बुरशीजन्य पाव खाण्यात आल्याने विषबाधा अर्थात Food Poisoning होते आणि बुरशीतील aflatoxins, ochratoxins पोटात गेल्यास उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी यासारखी लक्षणे दिसू शकतात. एवढंच नाही तर त्यातले काही मायकोटॉक्सिन्स थेट आतड्यांच्या आतील थराला हानी पोहोचवू शकतात.

कुंडी आणि मातीचीही गरज नाही, साध्या कपामध्येही उगवेल भरपूर कोथिंबीर- घ्या भन्नाट ट्रिक 

ज्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो, बद्धकोष्ठता किंवा अतिसार होऊ शकतो. याचा नीट इलाज न झाल्यास यकृताचंही नुकसान होऊ शकतं किंवा पचनसंस्थेच्या इतर अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषत: Aflatoxin मुळं यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. काही पेशंट्सना या बुरशीमुळे पचनसंस्थेत ॲलर्जी होऊन पोटात दुखतं किंवा आतून सूज येऊ शकते.

 

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, कर्करोगग्रस्त रुग्ण यांना या बुरशीजन्य आजारांचा धोका जास्त असतो. आमच्या एका पेशंटनं तर “मला होऊच शकत नाही, मी तर बुरशीसारखा दिसणारा भाग काढून पाव खाल्ला होता” असा दावा केला..

घरात काळजी घेताच, पण घराबाहेर गेल्यानंतर मुलांना डास चावू नये म्हणून ५ टिप्स- मुलं सुरक्षित..

पण बाबाहो, पावाची स्पंजसारखी रचना बघा, मायकोटॉक्सिन्स पावाच्या इतर भागातही पसरलेले असू शकतात.. त्यामुळे वरवर स्वच्छ दिसणारा पावही आतून बुरसटलेला असू शकतो. पाव कोरड्या ठिकाणी ठेवणे, त्याची मुदत तपासणे, पावावर डाग दिसल्यास पाव फेकून देणे वगैरे काळजी घ्या, पण या दमट वातावरणात पाव काय इतर बेकरी पदार्थही न खाणंच श्रेयस्कर !
 

Web Title: avoid bread and other bakery product in monsoon, side effect of eating bread and other bakery product in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.