Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ताक पिताना 'या' चुका केल्या तर तब्येत बिघडणारच, उन्हाळ्यात ताक जरुर प्या, पण..... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 12:53 IST

Avoid 5 Mistakes While Drinking Buttermilk or Chaas: उन्हाळा आला आहे. त्यामुळे आता ताक पिण्याचे प्रमाण वाढणार. पण ताक पिण्याचे फायदे खरंच शरीराला मिळवून द्यायचे असतील तर काही चुका टाळायलाच हव्या..(correct method of drinking buttermilk)

ठळक मुद्दे हल्ली रेडीमेड ताकाची बंद पाकिटं दुकानांमध्ये मिळतात. पण असे ताक पिणं टाळायला हवं.

ताक हे अतिशय आरोग्यदायी आहे. काही तज्ज्ञ असंही सांगतात की रोज दही खाण्यापेक्षा तर तुम्ही १ ग्लास ताक प्यायलं तर त्याचे शरीराला निश्चितच खूप चांगले लाभ होतात. त्यामुळे काही जण अगदी रोजच ताक पितात. काही जण उन्हाळ्यात आवर्जून ताक पितात. पण ताक पिताना काही गोष्टींकडे मात्र लक्ष द्यायला हवं. कारण ताक पिताना काही चुका केल्या तर त्याचा शरीराला लाभ होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं (correct method of drinking buttermilk). त्यामुळे ताक पिताना कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या गोष्टी कराव्या ते पाहूया...(avoid 5 mistakes while drinking buttermilk or chaas)

 

ताक पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

१. फ्रिजमधलं अतिशय थंडगार पाणी घालून तयार केलेलं गारेगार ताक पिणं टाळायला हवं. ताक करताना नेहमी रुम टेम्परेचरवर असणारं पाणी वापरा. खूप थंड ताक प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे अपचन, ब्लोटींग, गॅसेस असेही त्रास होतात.

२. खूप शिळं झालेलं, आंबट असणारं ताक पिऊ नका. त्यामुळे ॲसिडीटी वाढू शकते. उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या रोज ताजं तयार केलेलं ताक प्या.

३. हल्ली रेडीमेड ताकाची बंद पाकिटं दुकानांमध्ये मिळतात. पण असे ताक पिणं टाळायला हवं. कारण त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्स, अतिरिक्त साखर असू शकते. ताक प्यायचं तर ते घरी तयार केलेलंच प्या.

 

४. रात्री ताक पिणे टाळायला हवे. कारण रात्रीच्या वेळी ताक प्यायल्याने कफ प्रवृत्ती वाढते. दुपारच्या जेवणात ताक पिणे सगळ्यात जास्त चांगले. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा जेवणात मध्ये मध्ये एकेक घोट ताक प्यावे.

५. साखर घालून ताक पिणं टाळावं. कारण त्यामुळे ताकातल्या कॅलरी वाढतात. ते पचायला जड होते. ताकात मीठ घालून पिणे जास्त चांगले. शिवाय फळांसोबत ताक घेणेही टाळावे. ही माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these mistakes while drinking buttermilk for better health this summer.

Web Summary : Buttermilk is healthy, but avoid these mistakes: Don't drink very cold or stale buttermilk. Avoid store-bought buttermilk with preservatives. Drink it during the day, not at night. Skip adding sugar; salt is better. Avoid fruit combinations for maximum benefits.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स