Join us

'या' ४ चुकांमुळे पाठदुखी-कंबरेचा होतो त्रास, तासन्तास लॅपटॉपवर बसून करताय काम? बघा काय करायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 09:44 IST

Laptop ergonomics for neck pain: Preventing back pain from laptop use: How to avoid neck strain while working on a laptop: good working posture using laptop: Best laptop posture for avoiding health issues: Healthy habits for laptop users: Laptop setup to reduce neck and back pain: Tips to reduce laptop-related health problems: How to prevent tech neck: दिवसभर लॅपटॉपवर काम करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात.

हल्ली प्रत्येकाचे काम हे लॅपटॉपवरुन असते. लॅपटॉप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. (Preventing back pain from laptop use) ऑफिसच्या कामासाठी जवळपास ८ ते ९ तास आपण लॅपटॉप, कॅम्प्युटर आणि मोबाईलवर काम करतो. (good working posture using laptop) सतत एकाच जागी बसल्याने आपल्या आरोग्यावरही त्याचे परिणाम होतात. यामुळे पोटाचा आणि कंबेरचा भाग वाढणं, पाठ-मान आणि खांदे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Best laptop posture for avoiding health issues)

वर्क फ्रॉम होममुळे आपल्या कामाचे तास अधिक वाढतात. घर आणि ऑफिसचं काम सांभाळताना आपल्यालाकडून अनेक चुका होतात, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकदा कामाचा प्रेशर असल्यावर आपल्याला जागेवरुन हलताही येतं नाही. (How to avoid neck strain while working on a laptop) अशावेळी हात-पाय सुन्न पडतात. काम संपल्यानंतरही ऑफिसचे चक्र आपल्या डोक्यात घुमत राहाते. दिवसभर लॅपटॉपवर काम करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. जर आपणही तासन्तास लॅपटॉपवर बसून काम करत असू तर ४ चुका अजिबात करु नका. 

चालताना-धावताना धाप लागते, अचानक बीपी वाढते? रोज करा ३ गोष्टी, हृदय राहिल निरोगी

1. पोटावर झोपणे

वर्क फ्रॉम होममुळे आपल्या ऑफिससोबत घराचे कामही करावे लगाते. काम करताना अक्षरश: आपण थकतो. यामध्ये अनेकांना सवय असते की, लॅपटॉप बेड किंवा जमीनवरुन ठेवून पोटावर झोपून काम करायची. असे केल्याने आपल्या पाठीच्या मणक्यावर दाब येतो. तसेच पोटावर अधिक वेळ झोपल्याने त्रास होऊ शकतो. यामुळे पोटदुखी आणि कंबरदुखीच्या समस्या अधिक वाढतात. 

2. मान दुखणे 

अनेकदा लॅपटॉप आपण चुकीच्या पद्धतीने ठेवतो, ज्यामुळे डोळ्यांसह मानेवर परिणाम होतो. लॅपटॉप सरळ दिशेत ठेवल्यामुळे त्याच्या स्क्रिनकडे पाहण्याची आपली क्षमता अधिक वाढते. ज्यामुळे डोळे दुखण्याची आणि डोळ्यांवर ताण येण्याची समस्या कमी होते. तसेच मानेवर दाब आल्यामुळे कुबड येऊ शकते. किंवा मान कडक होऊन दुखणे अधिक वाढते. 

3. लॅपटॉप मांडीवर घेऊन बसणे

अनेकांना बेडवर लोळत किंवा सोफ्यावर बसून काम करण्याची सवय आहे. अशावेळी आपण लॅपटॉप मांडीवर घेऊन बसतो, असे करणे चुकीचे आहे. लॅपटॉप वापरताना त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. मांडीवर लॅपटॉप घेऊन बसल्याने त्यातून निघणारी हिट आणि रेडिएशन शरीरावर परिणाम करतो. यामुळे आपल्या मणक्याला त्रास होऊ शकतो. तसचे मानसिक आरोग्य देखील बिघडू शकते. यासाठी लॅपटॉप मांडीवर ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली उशी ठेवून वापरा. 

5. डोळे कोरडे पडणे

लॅपटॉपच्या स्क्रिनकडे एकटक किंवा तासन्तास पाहात राहिल्याने आपले डोळे आपोआप मिचकतात. यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्क्रिन टाइमवर काम करताना सतत १०-१५ मिनिटांचा ब्रेक घ्या. यामुळे डोळ्यांवर ताण येणारं नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स