उन्हामुळे अनेक शारीरक समस्या उद्भवतात. काही फार कॉमन असतात. त्यामुळे त्यांची कारणे तसेच त्या समस्यांवर घरगुती उपाय आपल्याला माहिती असतात. (Are your eyes tearing? See what are the causes and remedies)मात्र अशाही काही समस्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात, ज्या काही ठराविक लोकांनाच होतात. त्या काही फार गंभीर नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते. (Are your eyes tearing? See what are the causes and remedies)उन्हाळ्यातच असे नाही इतरही वेळी अधून मधून असे पाणी डोळ्यातून येत असते. आपण म्हणतो माती गेली असेल किंवा झोप पूर्ण नाही झाली मात्र समस्या वेगळीही असू शकते.
१.आजकाल आपण दिवसभर लॅपटॉप समोर काम करतो. ८ ते ९ तास डोळ्यांसमोर मोबाइल किंवा लॅपटॉप नाही तर कम्प्यूटर असतोच. (Are your eyes tearing? See what are the causes and remedies)सतत स्क्रीन बघितल्यानेही डोळ्यातून पाणी येते. आता काम करण्याला इलाज नाही. काम तर करायलाच हवे. सगळीकडेच ऑफीसची कामे ऑनलाईन स्वरुपाची असतात. त्यामुळे यंत्रणा वापरणे आपल्याला भाग आहे. पण आपण काळजी तर नक्कीच घेऊ शकतो. डोळ्यांवर पाणी मारायचे. तसेच मधेमधे लहान ब्रेक घ्यायचे. उपकरणांचा वापर करताना वापरण्यासाठी खास चष्मा मिळतो. तो वापरा. झोपताना डोळ्यांना गुलाब पाणी लावा. थंड मलम लावा.
२.उन्हामुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळेही डोळ्यातून पाणी येते. असे डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल या साईटवर सांगितले आहे. तसेच हेल्थलाईनच्या पानावरही माहिती उपलब्ध आहे. सनग्लासेसचा वापर करा. सूर्य किरणांचा मारा कमी झाल्यावर पाणीही येणार नाही.तसेच टोपी वापरा.
३.जर कशाची ऍलर्जी झाली असेल तरी डोळ्यातून पाणी येते. जर पाणी यायचे थांबतच नसेल तर एकदा वैद्यांचा सल्ला घ्या. काही आजार किंवा ऍलर्जीचे लक्षण नाही ना याची खात्री करा.
४.झोपेचा अभाव असेल तरी डोळ्यातून पाणी येते. त्यामुळे योग्य झोप घ्या. डोळे चोळू नका.
५.जर तुम्ही मानसिक समस्येतून जात असाल तरी डोळ्यातून पाणी येते. काही जणांना पटकन व्यक्त होता येत नाही. मग साचलेले अश्रु वेगळ्या मार्गाने बाहेर येतात. मानसिक ताण असेल तर मानसोपचारतज्ज्ञाकडे जायलाच हवे.