Join us

तुम्हीही करताय वॉटर फास्टींग? मग आधी हे वाचून घ्या. बारीक होण्याची घाई जीवावर बेतेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 14:20 IST

Are you also doing water fasting? Then read this first : पटकन बारीक होण्याच्या नादात शरीराची वाट लागेल. काळजी घ्या. नको ते उपय करू नका.

आजकाल ब्यूटी स्टॅन्डर्ड फारच बदलले आहेत. अनेक मुलींना त्यांच्या आरोग्यापेक्षा त्यांचे लूक्स जास्त महत्त्वाचे वाटत आहेत, असं दिसून येतं. त्यांना काहीही करून बारीक व्हायचेच आहे. (Are you also doing water fasting? Then read this first. )छान दिसण्यासाठी बारीक होणे नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण बारीक होण्यासाठी निवडलेल्या मार्गाचं काय? आता जमाना  सुपरफास्टचा आहे. सगळं कसं लगेच व्हायला हवं असतं. त्यामुळे मुली आठवड्याभरात वजन कमी करण्यासाठी उपाय शोधतात. अनेक इन्फ्लुएंसर्ससुद्धा असे व्हिडियो टाकतात.(Are you also doing water fasting? Then read this first. ) ज्यात '४ दिवसात करा ४ किलो कमी' असे दावे असतात. मुली त्याला बळी पडतात. वजन कमी करणे ही काही झटपट करायची गोष्ट नाही. त्यासाठी वेळ लागतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. 

आजकाल वॉटर फास्टींगचा ट्रेंड सुरू आहे. आठवडाभर फक्त पाणी पिऊन राहायचे. वजन झटपट कमी होते. शरीराला काही अन्न मिळालेच नाही की ते फॅट्सचा वापर करते. म्हणून मग पटकन वजन घटते. लोकांना जरी ही पद्धत छान वाटत असली तरी डॉक्टर 'असे करू नका' असाच सल्ला देतात. डायटीशिन सुमन पहूजा तिच्या एका क्लायंटचा किस्सा सांगतात. असच वॉटर फास्टिंग करणाऱ्या एका महिलेला चक्कर आली आणि अशक्तपणामुळे दवाखान्यात दाखल करावे लागले. शरीराला दिवसभरासाठी सर्व पोषकसत्वांची गरज असते. पाण्यातून काहीच मिळणार नाही. त्यामुळे पटकन बारीक होण्यासाठी असे काही प्रयोग करणे म्हणजे अवैचारीकच आहे. 

वॉटर फास्टिंगने आठवडाभरात नाही तर, काही दिवसातच वजन कमी होते. पण ते काहीही खाल्यावर वेगाने वाढते. बिना अन्नाचे आयुष्यभर तर तुम्ही राहू शकत नाही. त्यामुळे असे प्रयोग करूच नयेत .वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या पावडर वगैरेसुद्धा वापरू नयेत. नैसर्गिकरित्याच वजन कमी करणे योग्य आहे. चांगला आहार घ्या. व्यायाम करा. वजन कमी होण्यासाठी ६ महिने अगदी वर्ष लागू शकते. पण लक्षात ठेवा, 'सबर का फल मिठा होता है.' झटपट च्या नादात शरीराची वाट लावून घेऊ नका.        

टॅग्स : पाणीमहिलाअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४वेट लॉस टिप्स