Join us
Daily Top 2 Weekly Top 5

प्रत्येक ५ पैकी ४ महिलांना असतो 'या' कॅन्सरचा धोका? महिलांना माहिती हवी ही कारणं आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2026 16:43 IST

cervical cancer risk: cervical cancer awareness: women health cancer: वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा कॅन्सर टाळता येऊ शकतो किंवा सुरुवातीच्या काळात आपल्याला सहज ओळखता येतो.

महिलांच्या आरोग्याबाबत भारतात आजही अनेक गोष्टींकडे सहजपणे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये 'सर्व्हाइकल कॅन्सर' (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशय मुखाचा कर्करोग हे मोठे आव्हान ठरत आहे.(cervical cancer risk)  धक्कादायक आकडेवारीनुसार, अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याच्या कारणीभूत असणाऱ्या विषाणूचा संसर्ग होतो.(cervical cancer awareness) म्हणूनच, प्रत्येक स्त्रीने या आजाराबद्दल वेळेत माहिती घेणे आणि सावध राहणे काळाची गरज आहे.(women health cancer) भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा कॅन्सर टाळता येऊ शकतो किंवा सुरुवातीच्या काळात आपल्याला सहज ओळखता येतो. 

फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट

सर्व्हाइकल कॅन्सर हा विषाणू लैगिंक संपर्कातून पसरु शकतो. मात्र HPV संसर्ग झाला म्हणजे लगेच कॅन्सर होतोच असं नाही. अनेक प्रकरणांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती हा विषाणू स्वतःच नष्ट करते. पण संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

सर्व्हाइकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या खालच्या भागाला जो जो योनीमार्गाशी जोडलेला असतो, त्याला 'सर्व्हिक्स' म्हणतात. या भागातील पेशींची अनियंत्रितपणे वाढ झाली की सर्व्हाइकल कॅन्सरचा धोका वाढतो. हा प्रामुख्याने  HPV (Human Papillomavirus) या विषाणूच्या संसर्गामुळे होतो.

जर लवकर वयात लैगिंक संबंध किंवा गर्भधारणा होत असेल तर यामागचे हे मुख्य कारण असू शकते. तसेच मासिक पाळी दरम्यान किंवा स्वच्छतेच्या चुकीच्या सवयींमुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. ज्या महिलांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना या विषाणूचा धोका अधिक असतो.

गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करणं देखील काही प्रमाणात सोप आहे. त्यासाठी आपल्याला HPV लस घ्यावी लागेल आणि नेहमी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. तसेच नियमित आपण तपासणी करायला हवी. ज्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आपण पॅप स्मीअर चाचणी करायला हवी. जे आपल्या पेशींमध्ये होणारे बदल ओळखण्यास मदत करतात.   

English
हिंदी सारांश
Web Title : Cervical cancer: Risk, causes, and prevention every woman should know.

Web Summary : Cervical cancer is a major health challenge for Indian women. HPV infection, often sexually transmitted, is a primary cause. Early detection through regular checkups, HPV vaccination, and safe sex practices are crucial for prevention and treatment.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स