Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उग्र वासाची डास पळवणारी अगरबत्ती ठरतेय जीवघेणी, वाढले फुप्फुसांचे आजार-कमी होतात श्वास

उग्र वासाची डास पळवणारी अगरबत्ती ठरतेय जीवघेणी, वाढले फुप्फुसांचे आजार-कमी होतात श्वास

mosquito repellent incense: harmful effects of mosquito coils: incense stick side effects: डास पळवणाऱ्या अगरबत्त्यांचा धूर फक्त डासांनाच नाही तर आरोग्यासाठी देखील धोकादायक आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 15:43 IST2025-09-17T15:42:14+5:302025-09-17T15:43:01+5:30

mosquito repellent incense: harmful effects of mosquito coils: incense stick side effects: डास पळवणाऱ्या अगरबत्त्यांचा धूर फक्त डासांनाच नाही तर आरोग्यासाठी देखील धोकादायक आहेत.

are mosquito repellent incense sticks harmful for lungs side effects of mosquito coil smoke on children natural alternatives to mosquito repellent incense | उग्र वासाची डास पळवणारी अगरबत्ती ठरतेय जीवघेणी, वाढले फुप्फुसांचे आजार-कमी होतात श्वास

उग्र वासाची डास पळवणारी अगरबत्ती ठरतेय जीवघेणी, वाढले फुप्फुसांचे आजार-कमी होतात श्वास

ऋतू कोणताही असला तरी डासांची समस्या कायमच असते. डासांना पळवून लावण्यासाठी आपण अगरबत्त्या, कॉइल्स किंवा इतर अनेक केमिकल्स गोष्टींचा वापर करतो.(mosquito repellent incense) डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी अनेकांच्या घरी रात्रीच्या वेळी सुगंधित धूर, अगरबत्ती किंवा कॉईल्स लावले जातात.(harmful effects of mosquito coils) पण यातून निघणारे धूर आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करतात. अनेक संशोधनामध्ये असं आढळून आलं की, डास पळवणाऱ्या अगरबत्त्यांचा धूर फक्त डासांनाच नाही तर आरोग्यासाठी देखील धोकादायक आहेत. (incense stick side effects)

केस सरळ करणाऱ्या हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायरनेही वाढतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तज्ज्ञांचा इशारा..

या अगरबत्त्यांमध्ये वापरले जाणारे केमिकल्स आणि धूर हे श्वासावाटे शरीरात जातात आणि हळूहळू श्वसनाच्या समस्या वाढवू शकतात. यामुळे ऍलर्जी, खोकला, श्वास घ्यायला त्रास, दमा यांसारख्या समस्या निर्माण होतात. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दमा, सायनस सारख्या आजारांनी त्रस्त असलेले लोक यामुळे जास्त धोक्यात येतात. सतत याचा वापर केल्यास फुफ्फुसांमध्ये जळजळ होऊन क्रॉनिक आजार होण्याची शक्यता वाढते. एवढंच नव्हे तर काही केसेसमध्ये यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो असेही काही तज्ज्ञ सांगतात.

यात असणारे अलेर्थ्रिन, ट्रान्सफ्लुर्थ्रिन ही कृत्रिम कीटकनाशके आहेत. यात डास प्रतिबंधक कॉइल आणि व्होपोरायझर्समध्ये वापरला जातो. ज्याचा कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. पण बंद खोलीत स्प्रे केल्यामुळे ग हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडचण येते. 

अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुफ्फुसांच्या पडद्यांमध्ये संसर्ग निर्माण करतात. या  धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या पेशींसाठी घातक ठरु शकतात. हे रसायन लहान मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात.म्हणूनच, डासांपासून बचाव करण्यासाठी नेहमी नैसर्गिक उपाय शोधणे, खोलीत योग्य वायुविजन ठेवणे आणि अगरबत्ती सतत वापरणे टाळणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 

Web Title: are mosquito repellent incense sticks harmful for lungs side effects of mosquito coil smoke on children natural alternatives to mosquito repellent incense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.