प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात मसाल्यांच्या डब्यांत हमखास ओवा असतोच. ओवा हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक (Ajwain water benefits) मानला जातो. ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे अनेक शारीरिक तक्रारींवर गुणकारी (Ajwain water on empty stomach) ठरतात. विशेषतः ओव्याचे पाणी दररोज रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, पोटदुखी कमी होते, आणि वजन कमी करण्यासही मदत होते(What Happens If You Drink Ajwain Water on an Empty Stomach Daily Dr. Hansaji Yogendra Shares Amazing Benefits).
महिनाभर हे पाणी नियमित प्यायल्यास शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळतात, जे दीर्घकाळापर्यंत आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. नुकतेच, ‘डॉ. हंसाजी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या योगगुरू हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे आणि ते तयार करण्याची योग्य पद्धत याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.
महिनाभर उपाशी पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे...
१. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते :- योगगुरू हंसा योगेंद्र यांच्या सांगण्यानुसार, ओव्यामध्ये थायमॉल नावाचे घटक असते, जे आपल्या पोटातील गॅस्ट्रिक रस (पचन रस) स्रवणास उत्तेजन देते. यामुळे अन्न लवकर आणि प्रभावीपणे पचते. परिणामी, पोटाशी संबंधित समस्या कमी होतात आणि पचनक्रिया सुधारते.
भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...
२. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम :- जर तुम्हाला वारंवार गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा पोटात जडपणा जाणवत असेल, तर अशावेळी ओव्याचे पाणी त्वरित आराम देऊ शकते. हे पाणी केवळ तात्काळ आरामच देत नाही, तर नैसर्गिक पद्धतीने ही समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करते. ओव्याचे पाणी पोटाला थंडावा देते आणि शरीरातील गॅस बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त ठरते.
३. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर उपाय :- डॉ. हंसाजी सांगतात की, जे लोक नेहमी बाहेरचे अन्नपदार्थ खातात, त्यांच्यासाठी ओव्याचे पाणी अधिक उपयुक्त ठरते. ओव्यामध्ये अॅण्टीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे ई-कोलाई सारख्या हानिकारक जीवाणूंविरुद्ध लढा देतात. हेच जीवाणू डायरिया आणि पोट बिघडण्याचे प्रमुख कारण असतात. त्यामुळे खासकरून पावसाळ्यात दररोज ओव्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
नर्गिस फाकरी वर्षातून २ वेळा करते 'हा' उपाय, स्वतःला 'असं' ठेवते मेंटेन - पाहा तिचा फिटनेस फंडा...
४. पाळीच्यावेळी फायदेशीर :- योगगुरू हंसाजी सांगतात की, वरील सर्व फायद्यांव्यतिरिक्त ओव्याचे पाणी महिलांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. पाळीच्या काळात पोटदुखी किंवा क्रॅम्प्स येण्याची समस्या जाणवत असेल, तर ओव्याचे पाणी ओटी पोटातील पेशींना आराम देऊन वेदना कमी करण्यात मदत करते. यामध्ये असणारे ॲण्टीस्पास्मोडिक गुणधर्म मांसपेशींमधील ताण आणि आकुंचन कमी करतात, ज्यामुळे पोटदुखीपासून नैसर्गिक पद्धतीने आराम मिळतो.
ओव्याचे पाणी कसे तयार करावे ?
डॉ. हंसाजी सांगतात की, ओव्याचे पाणी दोन वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येते. एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्यावे. याचबरोबर, एक चमचा ओवा दोन कप पाण्यात घाला आणि ५ मिनिटांपर्यंत उकळा. नंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून घ्या आणि प्या. आपल्या आवडीनुसार आपण त्यात थोडा लिंबू रस आणि काळे मीठही घालू शकता, त्यामुळे चवही सुधारेल आणि त्या पाण्याचे फायदेही दुपटीने वाढतील.
या गोष्टी लक्षात ठेवा...
डॉ. हंसाजी सांगतात की, ओव्याच्या पाण्याचे अनेक फायदे असले तरीही, एकावेळी फक्त एकच ग्लास पाणी प्यावे. जास्त प्रमाणात घेतल्यास तोंडाला कोरडेपणा जाणवू शकतो किंवा पोटात जळजळ होण्याची शक्यता असते. ओव्यचे पाणी हा एक स्वस्त, सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे, जो सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी सुरक्षित आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. असं केल्याने पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारींपासून नैसर्गिकरीत्या आराम मिळू शकतो.