Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चार मेथीचे दाणे फोडणीत घाला, कडू मेथीचे पाहा अनेक औषधी आणि गोड फायदे

चार मेथीचे दाणे फोडणीत घाला, कडू मेथीचे पाहा अनेक औषधी आणि गोड फायदे

Add fenugreek seeds in diet, see the health benefits of bitter fenugreek : मेथी दाणे आहारात असणे आरोग्यासाठी फायद्याचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 15:58 IST2025-09-07T15:58:00+5:302025-09-07T15:58:50+5:30

Add fenugreek seeds in diet, see the health benefits of bitter fenugreek : मेथी दाणे आहारात असणे आरोग्यासाठी फायद्याचे.

Add fenugreek seeds in diet, see the health benefits of bitter fenugreek | चार मेथीचे दाणे फोडणीत घाला, कडू मेथीचे पाहा अनेक औषधी आणि गोड फायदे

चार मेथीचे दाणे फोडणीत घाला, कडू मेथीचे पाहा अनेक औषधी आणि गोड फायदे

मेथीचे दाणे पिठं भिजवताना किंवा काही ठराविक पदार्थ करताना वापरले जातात. मेथीचे दाणे कडू असतात म्हणून जर पदार्थ घालणे टाळत असाल तर तसे करु नका. हे दाणे आरोग्यासाठी, त्वचेसाठी तसेच इतर अनेक प्रकारे उपयुक्त मानले जातात. (Add fenugreek seeds in diet, see the health benefits of bitter fenugreek)छोट्याशा या दाण्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यात प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम तसेच जीवनसत्त्व ए , सी ,के आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच पण अनेक आजारांपासून बचावही होतो. 

पचन सुधारण्यासाठी मेथी दाणे फार उपयोगी आहेत. त्यातील पोषक घटक आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतात. तसेच अॅसिडिटी व अपचन कमी करण्यास मदत करतात. पित्ताचा त्रास कमी होतो. मधुमेह असणाऱ्यांनी आहारात मेथी दाणे घ्यायलाच हवेत. मेथीचे दाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. लोह व कॅल्शियममुळे शरीराची ताकद वाढते, तसेच रक्ताचे प्रमाण सुरळीत राहते. मेथीचे दाणे भिजवून पदार्थांत वापरल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचेच्या दृष्टीने मेथीचे दाणे खूप फायदेशीर मानले जातात. दाण्यांची पेस्ट करून चेहर्‍यावर लावल्यास पिंपल्स, डाग, पुरळ यावर राामबाण उपाय ठरतो. तसेच त्वचा तजेलदार दिसते. त्यातील अॅंटी ऑक्सिडंट्स आणि इतरही काही गुणधर्म त्वचा खराब होण्यापासून  बचाव करतात. तसेच सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. केसांसाठीसुद्धा मेथी उपयुक्त ठरते. दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात. कोंडा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते. महिलांच्या आरोग्यासाठीही मेथी विशेष फायदेशीर आहे. मासिक पाळीतील वेदना कमी करणे, हार्मोनल समतोल राखणे  यासाठी मेथीचा वापर केला जातो.

एकूणच पाहता, मेथीचे दाणे हे फक्त मसाला म्हणून मर्यादित नसून ते आरोग्य, सौंदर्य आणि पोषण यांचा उत्तम स्रोत आहेत. त्यांचा नियमित व मर्यादित वापर केल्यास शरीर निरोगी राहते, त्वचा व केस सुंदर राहतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
 

Web Title: Add fenugreek seeds in diet, see the health benefits of bitter fenugreek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.