दिवाळीचे ३ दिवस झरझर सरून जातात. पण त्याआधी कित्येक दिवस आपली मेहनत सुरू असते. दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी मागच्या कितीतरी दिवसांपासून घरातल्या महिला झटत असतात. स्वच्छता, सजावट, फराळ, पाहुण्यांची सरबराई असं किती किती करावं लागतं. ते सगळं झालं की मग या सगळ्या कामांचा शीण आल्यासारखा होतो आणि पाय, पाठ, कंबर, मान दुखायला लागतं. डोकंही दुखतं. हा त्रास कमी करण्यासाठी आराम करणं गरजेचं असतं. पण कित्येकजणींना ते ही शक्य नसतं. मग अशावेळी त्या सरळ पेनकिलर घेण्याचा पर्याय निवडतात. पण त्यापेक्षाही एक अतिशय भारी आणि खूप सोपा उपाय आपण पाहूया. हा उपाय काही सेकंद जरी केला तरी तुमचं दुखणं कुठच्याकुठे पळून जाईल.(acupressure point on palm that gives instant relief from body pain)
शरीराचा थकवा किंवा दुखणं कमी करण्यासाठी उपाय
शरीराचा कोणताही भाग दुखत असेल किंवा डोळ्यांवर खूप ताण आला असेल तर तो सगळा त्रास पेनकिलर न घेता अगदी थोड्या वेळातच कसा कमी करायचा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी lokmat_sakhi and chikitsakneespine या पेजवर शेअर केला आहे.
अरे बापरे! हाताने पटापट डास मारता पण हात धूतच नाही? ३ आजारांचा खूपच धोका
यामध्ये डॉक्टर सांगतात की हाताचा अंगठा आणि पहिलं बोट यांच्या मधोमध जो बिंदू असतो तो बिंदू आपल्या शरीरासाठी एखाद्या पेनकिलरप्रमाणे काम करतो. जेव्हा केव्हा शरीराचा एखादा भाग दुखत असेल तेव्हा पेनकिलर घेण्यापुर्वी हातावरचा तो बिंदू ५ सेकंदासाठी जोर देऊन दाबा.
त्यानंतर पुन्हा हात रिलॅक्स करा आणि पुन्हा दाब द्या. असं साधारण ८ ते १० वेळा करा. दाब देणे आणि सोडणे अशा प्रकारे पंपिंग केले तरी चालेल. तुमचा त्रास काही वेळातच कमी होईल.
छोट्या- मोठ्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरणारी ५ औषधी रोपं! बाल्कनीतल्या छोट्या कुंडीतही छान फुलतील..
पण जर वारंवार शारिरीक त्रास होत असेल, व्यायाम करून किंवा वरील उपचार करूनही फरक पडत नसेल तर दुखणं जास्त दिवस अंगावर न काढता तात्काळ जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपाय करणंच उत्तम असं डॉक्टर सुचवतात.
