Join us

अरुणा इराणी म्हणतात माझ्या 'या' चुकीमुळे मला दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाला, ती चूक टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 20:00 IST

Aruna Irani Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना २ वेळा ब्रेस्ट कॅन्सरने गाठलं होतं. त्याविषयी त्यांनी दिलेली ही खास माहिती.. 

ठळक मुद्दे सौंदर्य हा विषय तात्पुरता दूर ठेवून फक्त आरोग्य या एकाच विषयावर फोकस केलं तर नक्कीच या आजारातून बाहेर येणं शक्य आहे.

कॅन्सरशी झुंज देणारे अनेक सेलिब्रेटी आज आपण बघतो आहोत. हिना खान, दीपिका कक्कर ही त्यातली काही ताजी उदाहरणं. या दोघींनीही त्यांचं आजारपण चाहत्यांपासून लपवून ठेवलं नाही. हिना तर ज्या सकारात्मकतेने तिच्या आजारपणाला सामोरी गेली ते पाहूनच कॅन्सरच्या अनेक रुग्णांनाही नक्कीच नवी उमेद मिळाली असणार. अरुणा इराणी यांना जेव्हा बेस्ट कॅन्सर झाला होता तेव्हा त्यांनी त्याबाबत मात्र पुर्णपणे मौन बाळगलं. एकदा कॅन्सर होऊन, त्यावर उपचार घेऊन त्या त्यातून बाहेरही पडल्या. पण त्याच वेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आणि दुसऱ्यांदा पुन्हा त्यांचा आजार उफाळून आला.(Aruna Irani Breast Cancer)

 

अरुणा इराणींना पुन्हा कॅन्सर का झाला?

‘लेहरन रेट्रो’ यांना दिलेल्या मुलाखतीत अरुणा इराणी सांगतात की २०१५ साली नेहमीप्रमाणे त्यांचं शूटिंग, इतर कामं सुरू होती. त्याच वेळेस काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याचं निदान झालं.

आमिर खान म्हणतो- नुसताच व्यायाम करून उपयोग नाही, वजन घटविण्यासाठी 'ही' गोष्ट खूप गरजेची

ऑपरेट करून त्यांनी तिथली गाठ काढून टाकली. यामुळे कॅन्सरची गाठ त्यांच्या शरीरातून निघून गेलेली असली तरी डॉक्टरांनी त्यांना केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला होता. पण अरुणा इराणींनी मात्र तो सल्ला ऐकला नाही. कारण डोक्याचे केस जातील, त्वचेवर वाईट परिणाम होईल आणि त्यामुळे त्यांचं करियर थांबेल अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी केमोथेरपीऐवजी औषध गोळ्या घेण्याचा पर्याय स्वीकारला. 

 

याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि २०२० मध्ये कोविडदरम्यान त्यांचा ब्रेस्ट कॅन्सरचा आजार पुन्हा एकदा उफाळून आला. त्याच ठिकाणी पुन्हा एक गाठ तयार झाली.

फक्त १० मिनिटांत करा चटपटीत टोमॅटो चटणी! डोसा, पोळी, पराठ्यासोबत खायला एकदम बेस्ट

यावेळी डॉक्टरांचा सल्ला ऐकण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. अरुण इराणींच्या उदाहरणावरून हेच दिसून येतं की जर या आजारातून तुम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं असेल तर हिंमत ठेवायला हवी. हिना खानप्रमाणेच पॉझिटीव्ह ॲटीट्यूड ठेवायला हवा. आणि डॉक्टर जी काही ट्रीटमेंट देतील ती पूर्णपणे पाळायला हवी. सौंदर्य हा विषय तात्पुरता दूर ठेवून फक्त आरोग्य या एकाच विषयावर फोकस केलं तर नक्कीच या आजारातून बाहेर येणं शक्य आहे.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअरुणा इराणीकर्करोगस्तनाचा कर्करोग