Join us

गरमागरम पोटली शेक, गॅस-ॲसिडिटी-पोट फुगण्यावर सोपा आणि असरदार उपाय-सर्वांसाठीच उपयोगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 17:43 IST

Acidity Relief Potli How To Stop Acidity In Ayurveda Know From Nutritionist : home remedy for acidity : how to make potli for stomach gas : Ayurvedic Remedy For Gas-Acidity : पोट शेकण्याचा हा पारंपरिक उपाय पावसाळ्यात फार कामाचा

सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे पोटांत गॅस होणे आणि अ‍ॅसिडिटी (Home remedies for gas & acidity) ही एक कॉमन समस्याच झाली आहे. गॅस आणि अ‍ॅसिडिटी झाल्यास आपल्याला बेचैन वाटू लागते. पोटात गॅस आणि आम्लाचे प्रमाण जास्त वाढल्याने (Home Remedies To Treat Gas & Acidity Problem) पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे किंवा (Ayurvedic Remedy For Gas-Acidity) छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावतात. एकदा का गॅस व अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाला की आपल्याला अगदी नकोस वाटू लागत. काहीजणांच्या बाबतीत गॅस, ॲसिडिटी, पोट फुगण्याची समस्या इतकी वाढते की, आपल्याला थेट डॉक्टर गाठवा लागतो(Acidity Relief Potli How To Stop Acidity In Ayurveda Know From Nutritionist).

गॅस, अ‍ॅसिडिटी झाल्यास आपण वेगवेगळ्या प्रकारची औषध, सिरप, गोळ्या घेतो. परंतु या वारंवार होणाऱ्या गॅस, अ‍ॅसिडिटीवर काही इन्स्टंट घरगुती उपाय देखील करू शकतो. या उपायांच्या मदतीने आपल्याला काही मिनिटांतच गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो. फार औषधं न घेता जर घरच्याघरीच काही उपाय मिळाले, तर त्यासारखं दुसरं (how to make potli for stomach gas) काहीचनाही! अशाच घरगुती उपायांमध्ये सध्या लोकप्रिय आणि स्वस्तात मस्त उपाय ठरत आहे तो म्हणजे 'औषधी पोटली'. घरातीलच काही मसाले आणि आयुर्वेदिक घटक वापरून तयार केलेली ही पोटली पोटाला ऊब देऊन गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करणारी जादुई पोटली घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहूयात. 

गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करणारी जादुई पोटली... 

गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करणारी जादुई पोटली कशी तयार करायची याची माहिती shweta_shah_nutritionist या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्या मते, गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील जादुई पोटलीची ऊब पुरेशी आहे. ही पोटली तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ टेबलस्पून ओवा, जिरे, बडीशेप, १ टेबलस्पून सूंठ पावडर व सैंधव मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.  

केस अचानकच पांढरे व्हायला लागलेत? ‘हे’ घरगुती तेल ठरते असरदार, केसांचं पांढरं होणं ‌थांबवत...

ही पोटली कशी तयार करायची ? 

सर्वप्रथम जिरे,ओवा, बडीशेप, सूंठ पावडर व सैंधव मीठ मंद आचेवर २ ते ३ मिनिटे परतून घ्या, जोपर्यंत त्यातून छान सुगंध येत नाही तोपर्यंत खरपूस परतून घ्यावे. हे गरम झालेले मिश्रण एका स्वच्छ, मऊ सुती कापडावर ओतावे आणि त्या कापडाची एक घट्ट पोटली तयार करावी. ही पोटली जेव्हा हलकी गरम असेल  तेव्हा ती नाभीच्या आजूबाजूला आणि पोटाच्या वरच्या भागावर हळूवारपणे ५ ते १० मिनिटे फिरवा. ही प्रक्रिया जेवल्यानंतर किंवा गॅस, अपचन यांसारख्या त्रासाच्या वेळी, आरामात झोपून करा.

Weight loss  : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण..

ही जादुई पोटली गॅस आणि अ‍ॅसिडिटीवर कशी फायदेशीर... 

श्वेता शहा सांगतात की, ओवा, जिरे आणि बडीशेप यामध्ये पचनशक्तीला चालना देणारे घटक असतात, जे गॅस आणि पोटातील जडपणा दूर करण्यास मदत करतात. सुंठ पावडर ही पोटाची सूज आणि जळजळ कमी करण्याचे काम करते. या सर्व घटकांसोबत केलेला हलका गरम शेक पोटातील जडपणा कमी करण्यास मदत करतो आणि शरीरातील पचनशक्ती मजबूत करण्यास फायदेशीर ठरते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय